शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १८ जणांवर कारवाई

By admin | Updated: November 16, 2014 22:53 IST

तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्रामगराडा येथे विनापरवाना नौटंकी नाटक करून न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन व धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात नौटंकी

इंदौरा/बु. : तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्रामगराडा येथे विनापरवाना नौटंकी नाटक करून न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन व धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात नौटंकी नाटक करणाऱ्यांसह लाऊडस्पिकर चालक व वाद्य वादकांसह १८ जणांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांना अटक केली. यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.सध्या तिरोडा तालुक्यात सर्वत्र मंडई उत्सव सुरू आहे. या उत्सवात नौटंकी नाटकांचे आयोजन करण्यात येते. गराडा येथे २५ आॅक्टोबर रोजी गायत्री मंदिरासमोर नौटंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या नाटकादरम्यान काही कलांवर प्रेक्षक दारू पिवून समाजविघातक वागणूक करीत असल्याने, ही नौटंकी नाटक या ठिकाणी न करता दुसऱ्या ठिकाणी करावे, अशी विनंती काही गावकऱ्यांनी आयोजकांना केली होती. परंतु विनंती न मानल्याने गावकऱ्यांनी तिरोडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था रहावी म्हणून कलम २४९ नुसार येथे नाटक करू नये, अशी नोटीस बजावली. मात्र त्यानंतरही नोटीसचे उल्लंघन करून रात्रभर मोठ्या आवाजात लाऊडस्पिकर लावून नौटंकी नाटक करण्यात आले. त्यामुळे आजूबाजूच्या आजारी व्यक्तींना त्रास झाला. गायत्री मंदिरासमोरच हे नाटक असल्याने लोकांच्या धार्मिक भावनासुद्धा दुखावल्या. शिवाय रात्री १० वाजतानंतर लाऊडस्पिकर वाजवू नये, असे न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. गराडा येथील रहिवासी सुनील बारापात्रे यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम १८८, २९८ अन्वये गुन्हा दाखल केला. यात देवदास बावणकर, हेमराज गभणे, सहादेव उके, कृष्णकुमार आमटे, प्रमोद चौधरी यांच्यासह लाऊडस्पिकर चालक व नाटकातील वाद्य वादक अशा एकूण १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करून न्यायालयातही उभे करण्यात आले. मागील पाच वर्षांच्या कालावधीत अशा प्रकार तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भागात घडला नव्हता. (वार्ताहर)