शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

आमगाव नगरी झाली बेवारस

By admin | Updated: March 7, 2016 01:34 IST

आमगावला नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा यासाठी टाकण्यात आलेली रिट याचिका (२०/२०१५) उच्च न्यायालय नागपूर खंडपिठाने रद्दबातल केली आहे.

रिट याचिका फेटाळली : ना ग्रामपंचायत, ना नगर पंचायत गोंदिया : आमगावला नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा यासाठी टाकण्यात आलेली रिट याचिका (२०/२०१५) उच्च न्यायालय नागपूर खंडपिठाने रद्दबातल केली आहे. यासह महाराष्ट्र शासनाची १२ फेब्रुवारी २०१५ ची अधिसूचनाही रद्दबातल करण्यात आली आहे. त्यामुळे सदर आदेशाच्या अनुषंगाने आजच्या स्थितीत आमगाव नगर पंचायत किंवा नगर परिषद आहे याचे चित्र स्पष्ट होत नाही. तर सदर आदेशामुळे प्रशासकांची सेवा समाप्त झाल्याचे निर्दशनास येते. त्यामुळे आमगाव नगरी आजघडीला बेवारस दिसत आहे. शासनाने जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा, देवरी, गोरेगाव, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव या सहा तालुकास्थळांचा दर्जा वाढ करून त्यांना नगर पंचायतचा दर्जा दिला होता. मात्र आमगावातील लोकसंख्येच्या दृष्टीने नगर पंचायत ऐवजी नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा या मागणीला घेऊन पद्मावती चुटे यांनी महाराष्ट्र शासनाविरोधात रिट याचिका टाकली होती. मात्र उच्च न्यायालय खंडपिठ नागपूर यांनी १० फेब्रुवारी रोजी ही याचिका रद्दबातल केली. तसेच महाराष्ट्र शासनाची १२ फेब्रुवारी २०१५ रोजीची नगर पंचायतबाबतची अधिसूचना रद्द करीत नगर पंचायत किंवा नगर परिषद बनविने हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील नसून राज्य शासनाने याबाबत योग्य निर्णय घेण्याचा निर्णय दिला आहे. सदर आदेशाच्या अनुषंगाने आजच्या स्थितीत आमगाव नगर पंचायत किंवा नगर परिषद आहे याचे चित्र स्पष्ट होत नाही. तसेच आदेशामुळे प्रशासकांची सेवा समाप्त झाल्याचेही म्हणणे वावगे ठरणार नाही. असे झाल्याने नगर पंचायतीचे चाललेले कारभार जसे विधि प्रमाणपत्र देणे, बांधकाम परवानगी देणे, मालमत्ता कराची वसुली, स्वच्छता विषयक बाबी, पाणी पुरवठा, पथदिवे इत्याही नागरी सुविधा खोळबंत असून नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.तसेच आता नागरिकांना आपल्या समस्या कोणाकडे नोंदवाव्या याबाबत असमंजस स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आमगाव नगरी आजघडीला बेवारस झाली असेच म्हणता येईल. याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. (शहर प्रतिनिधी)