शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

७० जोडपे अनुदानापासून वंचित

By admin | Updated: April 20, 2015 01:01 IST

पैशांचा अपव्यय व वेळेची बचत करण्यासाठी शासनाने सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याचे आवाहन केले.

गोंदिया : पैशांचा अपव्यय व वेळेची बचत करण्यासाठी शासनाने सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याचे आवाहन केले. या विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना १० हजार तर विवाह घडवून आणणाऱ्या संस्थांना प्रत्येक जोडप्यावर दोन हजार रूपये दिले जाते. परंतु गोंदिया जिल्ह्यातील ७० जोडप्यांना अजूनपर्यंत अनुदान देण्यात आले नाही. परिणामी शुभमंगल योजना अपयशी ठरत असल्याचे बोलले जात आहे. सन २०१३-१४ या वर्षात शुभमंगल योजनेंतर्गत जिल्हयातील सहा संस्थांकडून करण्यात आलेल्या विवाह सोहळ्यातील ८६ जोडप्यांना १० लाख ३२ हजार रूपये अनुदान देण्यात आले. परंतु ७० जोडप्यांना अजूनही कवडीची मदत देण्यात आली नाही. त्यामुळे सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न झालेली जोडपी या अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. लग्न लावून देणाऱ्या संस्था फक्त आपले अनुदान वाढविण्यासाठी वर-वधूंची संख्या वाढवितात. परंतु ते जोडपे निकष पुर्ण करीत नसल्याने अनुदानापासून वंचित राहतात. एकाच वर्षातील एवढे जोडपे अनुदानापासून वंचित आहेत. मागील तीन वर्षाची संख्या पाहता शेकडोंच्या संख्येत जोडपे अनुदानापासून वंचित आहेत. लग्न झालेल्या जोडप्यांंना अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात केले जात आहे. मागील तीन ते चार वर्षाच्या तुलनेत हा प्रकार गोंदिया तालुक्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न झालेले जोडपे कागदपत्रांचीपुर्तता योग्यरित्या करीत नसल्यामुळे त्यांना अनुदान देण्यात आले नाही. सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न झालेल्या जोडप्यांना शुभमंगल कन्यादान योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे या योजनेकडे नागरिक पाठ फिरवीत आहेत. तर आता लोकांनी सामूहिक विवाह सोहळ्यांकडे दुर्लक्ष करणे सुरू केले आहे. (तालुका प्रतिनिधी)संघटनांमध्ये स्पर्धाआयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात जोडप्यांची संख्या अधिक असावी यासाठी सामूहिक विवाह सोहळा घडवून आणणाऱ्या संस्था प्रयत्न करतात. अनेक संस्था लोकप्रतिनिधींच्या हाताशी काम करणाऱ्या लोकांच्या असल्यामुळे किंवा नेत्यांच्याच असल्यामुळे आपल्या संस्थेकडून अधिक जोडप्यांचा विवाह करण्यासाठी चढाओढ लागली आहे. सर्वाधिक जोडप्यांचे लग्न आपण घडवून आणले असा वेगळा बाणा दाखविण्याचा शौक काही संघटनांना आहे. त्यामुळे ते सामूहिक विवाह सोहळ््यात लग्न करण्यास आलेल्या जोडप्यांची शहानिशा न करता त्यांचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात उरकून टाकतात.