शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

६५ लाखांचे फायर सिम्युलेटर बंद

By admin | Updated: April 24, 2016 01:50 IST

नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील पोलिसांना आधुनिक शस्त्रांच्या फायरिंगची प्रॅक्टीस करता यावी यासाठी सहा वर्षापूर्वी ६५ लाख रुपये खर्च करून ‘फायर सिम्युलेटर’ देण्यात आले.

एमसीयू बिघडला : पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मागितले मार्गदर्शनमनोज ताजने गोंदियानक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील पोलिसांना आधुनिक शस्त्रांच्या फायरिंगची प्रॅक्टीस करता यावी यासाठी सहा वर्षापूर्वी ६५ लाख रुपये खर्च करून ‘फायर सिम्युलेटर’ देण्यात आले. मात्र या सिम्युलेटरचे मास्टर कंट्रोल युनिट (एमसीयु) काम करीत नसल्यामुळे काही महिन्यांपासून हे सिम्युलेटर पोलीस मुख्यालयात धूळखात पडले आहे. यासंदर्भात पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून एक महिना लोटला तरी अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे नक्षल्यांशी लढा देण्याच्या बाबतीत राज्याचे पोलीस प्रशासन किती गंभीर आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नक्षलवाद्यांशी समोरासमोर लढण्यासाठी जिल्ह्यात कार्यरत नक्षलविरोधी पथकातील (सी-६०) जवानांना सतत फायरिंगचा सराव करावा लागतो. याशिवाय इतरही पोलिसांना अधुनमधून फायरिंगचा सराव दिला जातो. पण त्यासाठी प्रत्यक्ष बंदुकीच्या गोळ्या खर्च करण्याची गरज पडू नये म्हणून सहा वर्षापूर्वी गोंदिया पोलीस दलाला अत्याधुनिक असे ‘फायर सिम्युलेटर’ देण्यात आले. त्या सिम्युलेटरवर एसएलआर, एके-४७, इन्सास, रिव्हॉल्वर अशा विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक रायफल्सच्या माध्यमातून पडद्यावरच फायरिंग करून अचूक नेम साधण्याचा सराव करण्याची सोय आहे. विशेष म्हणजे एकावेळी सहा जण फायरिंगचा सराफ करू शकतात. हा सराव करताना रायफल जरी इलेक्ट्रॉनिक असली तरी खऱ्याखुऱ्या रायफलने फायर केल्याचा अनुभव या सिम्युलेटरमधून येतो. त्यामुळे प्रत्यक्ष खऱ्या बंदुकींच्या गोळ्यांचा खर्च वाचतो.२०१० मध्ये गोंदिया पोलीस मुख्यालयात हे फायर सिम्युलेटर बसविण्यात आले. काही महिन्यांपूर्वीपर्यंत हे सिम्युलेटर व्यवस्थित काम करीत होते. पण आता त्याच्या मास्टर कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यावरील रायफल फायरिंगचा सराव बंद झाला आहे. वॉरंटीच्या कालावधीत हैदराबादच्या कंपनीकडे त्या सिम्युलेटरची देखभाल, दुरूस्ती होती. मात्र आता वॉरंटी कालावधी संपल्यामुळे गोंदिया पोलिसांनी त्या कंपनीला या बिघाडाची माहिती दिली असता कंपनीने नव्याने देखभाल-दुरूस्तीचा कंत्राट करण्याचा सल्ला दिला. तो करायचा नसेल तर कंपनीच्या इंजिनिअरची फी म्हणून ३५ हजार आणि रिपेअरिंगचा खर्च वेगळा देण्याची अट समोर केली. त्यामुळे याबाबत नेमका काय निर्णय घ्यायचा यासाठी जिल्हा पोलिसांना पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सल्ला हवा आहे. जिल्हा पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी अनभिज्ञता दर्शविली.पुणे, गडचिरोलीनंतर फक्त गोंदियातविशेष म्हणजे अशा पद्धतीचे फायर सिम्युलेटर केवळ पोलीस ट्रेनिंग स्कूल (पीटीएस) येथेच असतात. मात्र राज्यातील पोलीस मुख्यालयात हे सिम्युलेटर फक्त पुणे, गडचिरोली आणि गोंदियातच आहे. त्यातही गडचिरोलीतील सिम्युलेटर चालू स्थितीत असतानाही त्याचा वापर फारसा केला जात नाही. मात्र गोंदियात नियमितपणे सिम्युलेटरवरील सराव सुरू होता. आता ते नादुरूस्त होऊन पडल्यामुळे पोलिसांना प्रत्यक्ष गोळ्या चालवून सराव करण्याशिवाय पर्याय उरला नाही.महिनाभरापूर्वीच गेला डीजींकडे प्रस्तावगेल्या महिनाभरापासून जिल्हा पोलीस प्रशासन पोलीस भरतीच्या प्रक्रियेत व्यस्त आहे. त्यापूर्वीच या फायर सिम्युलेटरच्या दुरूस्तीसंदर्भात काय निर्णय घ्यायचा याबाबतचे मार्गदर्शन पोलीस महासंचालक कार्यालयाकडून घेण्यासाठी पत्र पाठविण्यात आले. मात्र त्यावर महासंचालक कार्यालयाकडून कोणतेही मार्गदर्शन अद्याप तरी मिळालेले नसल्याचे समजते.