६ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:29 IST2021-09-03T04:29:16+5:302021-09-03T04:29:16+5:30

देवरी : देवरी पोलिसांनी धाड घालून जुगार खेळत असलेल्या ६ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून १६,५०० रुपयांचा माल जप्त ...

6 gamblers caught red handed | ६ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले

६ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले

देवरी : देवरी पोलिसांनी धाड घालून जुगार खेळत असलेल्या ६ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून १६,५०० रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलिसांनी ग्राम शेडेपार येथे मंगळवारी (दि. ३१) ही कारवाई केली आहे.

ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी ग्राम शेडेपार येथील पाण्याच्या टाकीजवळ धाड घातली. राजेश मोहनलाल ढवळे (२९), सोमचरण हगरु प्रधान (३३), रवींद्र नरसिंग मडावी (३०), कुंदन नारायण गावळकर (२४), अश्विन राऊत, शामा मडावी यांना जुगार खेळताना रंगेहात पकडले. तसेच त्यांच्याकडून फडावर ८०० रुपये रोख, झडतीत ७०० रुपये रोख व १५,००० रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण १६,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. फिर्यादी मुकेश न्यायमूर्ती यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम १२ (अ) मजुकाअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई ठाणेदार सिंगनजुडे यांच्यासह सपोनि. आनंद घाडगे, पोहवा औरासे, पोना. न्यायमूर्ती, करंजेकर, परसमोडे, मस्के, पोशी डोहळे यांनी केली आहे.

Web Title: 6 gamblers caught red handed