शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

३२० राईस मिलर्सने केले धान भरडाईचे करारनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 17:24 IST

Gondia : ६ लाख क्विंटल धानाची उचल १५ दिवसांत भरडाई करून जमा करावा लागेल तांदूळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासन आणि राईस मिलर्स यांच्यातील चर्चा फिसकटल्याने गेल्या सात महिन्यांपासून शासकीय धानाची भरडाई ठप्प होती. यानंतर शासनासह चर्चा झाल्यानंतर जिल्ह्यातील ३२० राईस मिलर्सने शासकीय धानाची भरडाई करण्यासाठी करारनामे केले आहे, तर भरडाईसाठी ६ लाख क्विंटल धानाची उचल केल्याची माहिती आहे. 

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात हमीभावाने धान खरेदी केली जाते. धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची राईस मिलर्ससह करार करून त्याची भरडाई करून शासनाकडे सीएमआर तांदूळ जमा केला जातो. पुढे याच तांदळाचे राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना वितरण केले जाते. मात्र, यंदा राईस मिलर्सने धान भरडाईचे दर, वाहतूक भाडे, भरडाईच्या अनुदानात वाढ, वाहतूक भाड्याची थकीत रक्कम आदी विषयांना घेऊन शासकीय धान भरडाईवर बहिष्कार टाकला होता. जवळपास सात महिने हा बहिष्कार कायम होता.

त्यामुळे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरीप आणि रब्बी हंगामात खरेदी केलेल्या २९ लाख क्विंटल धानाची उचल थांबली होती, तर आदिवासी विकास महामंडळाला खरीप हंगामातील धानाची उचल न झाल्याने रब्बीत धान खरेदी बंद ठेवण्याची वेळ आली.

तब्बल सात महिन्यांच्या कालावधीनंतर शासन आणि राईस मिलर्स यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आता राईस मिलर्स शासकीय धानाची भरडाई करण्यास तयार झाले आहे. भरडाईसाठी ३२० राईस मिलर्सने करारनामे केले असून २९ लाख क्विंटल धानापैकी ६ लाख क्विंटल धानाची आतापर्यंत उचल केली आहे.

१५ दिवसांत जमा होणार तांदूळशासकीय धान खरेदी केंद्रावर भरडाईसाठी धानाची उचल केल्यानंतर राईस मिलर्सला १५ दिवसांत धानाची भरडाई करुन तो शासनाकडे जमा करावा लागणार आहे. तशा सूचनासुद्धा संबंधित विभागाने राईस मिलर्सला केल्या आहेत.

भरडाईची प्रक्रिया डिसेंबरपर्यंतयावर्षी शासकीय धानाची भरडाईसाठी उचल होण्यास ७ महिने विलंब झाला आहे. परिणामी, २९ लाख क्विंटल धानाची भरडाई रखडली होती. आता भर- डाईसाठी धानाची उचल करण्यास प्रारंभ झाला असून डिसेंबर महिन्यापर्यंत ही प्रक्रिया चालण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदियाAgriculture Sectorशेती क्षेत्र