शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

वनरक्षकपदाच्या ८१ जागांसाठी ३० हजार बेरोजगार इच्छुक

By admin | Updated: October 15, 2015 02:08 IST

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत विशेष व्याघ्र दलाच्या स्थापनेसाठी ८१ वनरक्षकांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे.

बेरोजगारीचा भस्मासूर : भरती प्रक्रियेसाठी २०० कर्मचारी तैनातगोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत विशेष व्याघ्र दलाच्या स्थापनेसाठी ८१ वनरक्षकांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या २१ पदांसाठी राज्यभरातून तब्बल ३० हजार ४०३ उमेदवारांनी आवेदन केले आहे. उमेदवारांची शारीरिक चाचणी १६ आॅक्टोबरपर्यंत पूर्णत्वास जाणार आहे.नवेगाव-नागझिरा प्रकल्पातील वाघांच्या संरक्षणासाठी व वन्यप्राण्यांच्या शिकारीवर आळा बसावा यासाठी नागपूर वनवृत्तातील गोंदिया वनविभागाच्या आस्थापनेवरील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत विशेष व्याघ्र संरक्षण दलाची स्थापना करण्यात येत आहे. त्यासाठी नव्याने वनरक्षकांची ८१ पदे निर्माण करण्यात आली असून पदभरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.सदर पदभरतीसाठी राज्यभरातून तब्बल ३० हजार ४०३ बेरोजगारांनी अर्ज केले. यावरून राज्यात बेरोजगारीचा भस्मासूर किती फोफावला आहे, याचा प्रत्यय येतो. व्याघ्र प्रकल्प गोंदिया-भंडारा जिल्ह्याचा असला तरी संपूर्ण राज्यभरातून या भरतीच्या शर्यतीत उमेदवार उतरले आहेत. जागा कमी आणि उमेदवार खूप जास्त असल्याने त्यांच्यात स्पर्धा कमालीची वाढली आहे. त्यामुळे पारदर्शकता ठेवावी लागणार आहे. (प्रतिनिधी)दोन ठिकाणी शारीरिक चाचणीउमेदवारांची संख्या वाढल्याने गोंदियात त्याची चाचणी घेणे कठीण झाले. त्यामुळे गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील १४ हजार उमेदवारांची शारीरिक चाचणी (दौड) गोंदिया येथे घेण्यात येत आहे. तर राज्यभरातील उर्वरित जिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवारांची चाचणी नागपूर येथे घेण्यात येत आहे. गोंदिया येथील शारीरिक चाचणी प्रक्रियेत पोलीस विभाग, आरोग्य विभाग, क्रीडा विभाग व वन विभागातील २०० कर्मचारी सहभागी झाले आहेत. उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांच्या नियंत्रणात ही प्रक्रिया सुरू आहे.प्रवर्गनिहाय भरण्यात येणाऱ्या जागाअनुसूचित जातीसाठी ११ जागा, अनुसूचित जमाती सहा, विजाअसाठी दोन, भजबसाठी दोन, भजपसाठी तीन, भजडसाठी दोन, विमाप्रसाठी दोन, इतर मागासवर्गीयांसाठी १५, खुल्या प्रवर्गासाठी ३८ अशी एकूण ८१ पदे निर्माण करण्यात आली. यापैकी २६ पदे महिलांसाठी, ११ पदे माजी सैनिकांसाठी, चार पदे खेळाडूंसाठी, चार पदे होमगार्डसाठी, सात पदे अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी, सात पदे रोजंदारी मजुरांसाठी तर सर्वसाधारण गटासाठी १८ पदे मंजूर आहेत.