२६ पासून आमगावला इंटरसिटीचा थांबा बंद

By Admin | Updated: June 13, 2014 00:14 IST2014-06-13T00:14:46+5:302014-06-13T00:14:46+5:30

रेल्वे मंत्रालयाने भंडारा गोंदिया जिल्ह्यातील मुख्य रेल्वे स्थानकावरील एक्सप्रेस गाड्यांचा थांबा बंद करण्याचे आदेश बजावल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडणार आहे. रेल्वे विभागाने आमगाव येथील

26 closed the intercity stop in Amagama | २६ पासून आमगावला इंटरसिटीचा थांबा बंद

२६ पासून आमगावला इंटरसिटीचा थांबा बंद

आमगाव : रेल्वे मंत्रालयाने भंडारा गोंदिया जिल्ह्यातील मुख्य रेल्वे स्थानकावरील एक्सप्रेस गाड्यांचा थांबा बंद करण्याचे आदेश बजावल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडणार आहे. रेल्वे विभागाने आमगाव येथील इंटरसिटीचा थांबा २६ जुलैपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाश्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.


रेल्वे विभागाने गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील तुमसर, तिरोडा, आमगाव या प्रमुख रेल्वे स्थानकावरून दररोज विविध रेल्वे मार्गाने प्रवास सुलभ व्हावा यासाठी प्रवाशांच्या मागणीप्रमाणे राजकीय पुढाऱ्यांनी या स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांचा थांबा मिळविण्यात यश मिळविले होते.


गोंदिया, भंडारा जिल्हा औद्योगिक, शैक्षणिक, क्रीडा, पर्यटन या बाबतीत संपन्न असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक स्थानकांवर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची गर्दी दिसून येते. परंतु मागील आठवड्यात रेल्वे मंत्रालयाने गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील तुमसर, तिरोडा, आमगाव स्थानकावरील एक्सप्रेस गाड्यांचा थांबा थांबविण्याचा आदेश काढला.
२६ जुलैपासून आमगाव स्थानकातील रेल्वे गाडी क्र. १२८५६ डाऊन नागपूर-बिलासपूर तर बिलासपूर-नागपूर अप गाडी क्र. १२८५५ इंटरसिटी एक्सप्रेस गाडीचा थांबा थांबविण्याचा आदेश रेल्वे मंत्रालयाने काढला आहे. त्यामुळे भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील प्रवाश्यांना आता अडचणींना समोर जावे लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 26 closed the intercity stop in Amagama