शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

२५० रूपयांची लाच भोवली

By admin | Updated: February 25, 2015 00:12 IST

घरकूल योजनेचे धनादेश देण्यासाठी २५० रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने स्थापत्य अभियांत्रिकी सहायकास रंगेहात पकडले.

गोंदिया : घरकूल योजनेचे धनादेश देण्यासाठी २५० रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने स्थापत्य अभियांत्रिकी सहायकास रंगेहात पकडले. मंगळवारी दुपारी १२.४० वाजतादरम्यान सालेकसा येथील पंचायत समिती कार्यालयात ही कारवाई केली. नामदेव सापकुजी भांडारकर (५६,रा.कट्टीपार) असे लाचखोर अभियांत्रिकी सहायकाचे नाव आहे. तक्रारदार हे हातमजूर असून त्यांना सन २०१४ मध्ये शासनाच्या इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामाकरिता एकूण १ लाख १० हजार रूपये सालेकसा पंचायत समितीकडून मंजूर करण्यात आले. त्यांना आॅक्टोबर २०१४ मध्ये ३७ हजार ५०० रूपयांचा पहिला धनादेश मिळाला होता. मात्र त्यासाठी त्यावेळी बांधकाम विभाग लिपीक भांडारकर याने एक हजार रूपयांची लाच घेतली होती. दरम्यान १६ फेब्रुवारी रोजी तक्रारदार यांनी पंचायत समिती कार्यालयात जाऊन दुसऱ्या धनादेशाबाबत माहिती घेतली. यावर मात्र भांडारकर याने धनादेश देण्यासाठी ५०० रूपयांची मागणी करीत अन्यथा धनादेश मिळणार नाही असे स्पष्ट केले. यावर तक्रारदारांनी त्याला नाईलाजाने २५० रूपये दिले. तसेच उर्वरीत २५० रूपये देऊन धनादेश घेऊन जाण्याचे ठरले. मात्र तक्रारदारास लिपीक भांडारकर यास लाच द्यायची नसल्याने त्यांनी २४ फेब्रुवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पथकाने २४ फेब्रुवारी रोजी सालेकसा पंचायत समितीच्या बांधकाम विभाग कार्यालयात सापळा लावला व लिपीक भांडारकर यास पंचांसमक्ष २५० रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. भांडारकर विरोधात सालेकसा पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७,१,३ (१)(ड) सहकलम १३(२) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई उपअधिक्षक दीनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, हवालदार दीपक दत्ता, नायक पोलीस शिपाई राजेश शेंद्रे, डिगंबर जाधव, रंजीत बिसेन, वंदना बिसेन यांनी केली.(शहर प्रतिनिधी)