शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपांचे २२०४ अर्ज ‘वेटींग’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील शेतीला मागील काही वर्षांपासून निसर्गाची मार सहन करावी लागत आहे. पाऊस पाहिजे त्या प्रमाणात बरसत नसल्याने याचा शेतीवर परिणाम जाणवत आहे. एका पावसासाठी हाती आलेले पीक निसटण्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळते. अशात सिंचनाची मदत घेऊन आपली शेती वाचविण्याची पाळी शेतकऱ्यांवर येते. मात्र सिचंनातून पाणी घेणे म्हणजे कृषी पंपाची गरज पडते.

ठळक मुद्देपेड पेंडिंगची आकडेवारी : १४९० अर्जांना दिली जोडणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतीसाठी कृषी पंपांना वीज जोडणी घेण्यासाठी शेतकरी पुढे येत असून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून त्यांना वीज जोडणी दिली जात नसल्याचे दिसून येत आहे. हेच कारण आहे की, आजही जिल्ह्यातील २२०४ शेतकरी कृषीपंप जोडणीसाठी ‘वेटींग’वरच आहेत. विशेष म्हणजे, या शेतकऱ्यांनी डिमांड भरली असूनही त्यांना वीज जोडणीसाठी महावितरणच्या चकरा माराव्या लागत आहेत.जिल्ह्यातील शेतीला मागील काही वर्षांपासून निसर्गाची मार सहन करावी लागत आहे. पाऊस पाहिजे त्या प्रमाणात बरसत नसल्याने याचा शेतीवर परिणाम जाणवत आहे. एका पावसासाठी हाती आलेले पीक निसटण्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळते. अशात सिंचनाची मदत घेऊन आपली शेती वाचविण्याची पाळी शेतकऱ्यांवर येते. मात्र सिचंनातून पाणी घेणे म्हणजे कृषी पंपाची गरज पडते. यामुळे शेतकरी आता पाण्याची सोय करून घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत.यासाठी शेतकरी आपल्या कृषीपंपांना अधिकृृत वीज मिळावी यासाठी वीज वितरण कंपनीकडे अर्ज करीत आहेत. केंद्र शासनाच्या उच्च दाब प्रणाली अंतर्गत शेतकºयांना वीज जोडणी द्यावयाची यासाठी जिल्ह्यातील २२१५ शेतकºयांची यादी महावितरणने ३१ मार्च २०१८ पर्यंत गोठविली आहे.यातील १४९० अर्जांना वीज जोडणी देण्यात आली असून ७२५ अर्ज पेंडींग होते. त्यानंतर कृषीपंप जोडणीसाठी शेतकºयांचे अर्ज येत राहिले व असे २२०४ अर्ज आडघडीला ‘वेटींग’वर आहेत. वीज जोडणीसाठीची डिमांड भरूनही हे शेतकरी आपल्या नंबरची वाट बघत बसले असून त्यांना नाहक वीज कंपनीच्या कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत आहेत.आता पडणार पंपांची गरजआता उन्हाळी शेतीची कामे सुरू असून आजही जिल्हा वरथेंबी पावसावर अवलंबून असल्यामुळे सिंचना शिवाय शेतकºयांना गत्यंतर नाही. अशात शेतकरी कृषीपंपांचा वापर करूनच शेती पिकऊ शकतात. मात्र ज्यांच्याकडे अद्याप वीज जोडणी आलेली नाही त्यांना मात्र अडचणच आहे. अशात आकडा घालून पंप चालवा हाच उपाय शेतकºयांकडे उरतो. त्यातही वीज वितरण कंपनीकडून अशा शेतकºयांवर गुन्हे दाखल केले जात असल्याने शेतकºयांची इकडे आड-तिकडे विहीर अशी स्थिती होते.

टॅग्स :agricultureशेती