शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

२२ केंद्र धान खरेदीपासून वंचित

By admin | Updated: November 25, 2015 05:39 IST

शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये त्यांचे धान आधारभूत किंमतीत खरेदी केले जावे यासाठी शासनाचे धान खरेदी केंद्र

शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष : मार्केटिंगचे ३६ तर आदिवासींचे २८ केंद्र सुरूगोंदिया : शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये त्यांचे धान आधारभूत किंमतीत खरेदी केले जावे यासाठी शासनाचे धान खरेदी केंद्र सुरू केले जाते. परंतु यंदा दिवाळीला पंधरवाडा उलटूनही जिल्ह्यातील २२ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. यात जिल्हा मार्केटींगचे १० तर आदिवासी विभागाचे १२ केंद्राचा समावेश आहे. जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयामार्फत ४६ धान खरेदी केंद्र सुरू करायचे होते. यातील ३६ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. तर १० केंद्र अद्याप सुरू झाले नाही. आतापर्यंत ३४ हजार २३४ क्विंटल धानाची खरेदी सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटींग अधिकारी गणेश खर्चे यांनी दिली आहे. आदिवासी विभागामार्फत गोंदिया जिल्ह्यात ४० धान खरेदी केंद्र सुरू करायचे होते. परंतु आतापर्यंत २८ केंद्र सुरू करण्यात आले. उर्वरीत १२ केंद्र सुरू करण्यात आले नाही. आदिवासी सोसायट्यांनी ४ हजार ६५२ क्विंटल धान खरेदी करण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक राजूलकर यांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)या ठिकाणचे केंद्र उघडण्याच्या प्रतीक्षेतजिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यामार्फत येणाऱ्या १० ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. काटी, धाबेटेकडी, भीवखीडकी, बाक्टी, कोटजंभूरा, येडमाकोट व मुरपार येथे गोदामाची सोय नसल्याने, अदासी येथे कर्मचारी नसल्याने, टेमणी व पांढरी येथील संस्थेची नुकतीच निवडणूक झाल्याने अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवडणूक झाली नाही. परिणामी धान खरेदीला सुरूवात झाली नाही. आदिवासी विकास महामंडळातर्फे सालेकसा, सातगाव, सावली, मुरदोली, भर्रेगाव, दरेकसा, पिपरीया, सालेकसा,बिजेपार, साखरीटोला, मक्काटोला व कोयलारी येथे धान खरेदीकेंद्र सुरू करण्यात आले नाही. गोदामांची समस्या आहे. मात्र ती समस्या लवकरच सोडवू. ज्या ठिकाणी गोदामांची समस्या आहे, अशा ठिकाणी नव्याने तयार करण्यात आलेल्या समित्या धान खरेदी करणाऱ्यास इच्छुक असतील तर नियमाच्या अधिन राहून जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीने धान खरेदी करण्याचे आदेश दिले जातील.गणेश खर्चेजिल्हा मार्केटींग अधिकारी गोंदिया.