शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

२१ लाईनमन सांभाळतात १५० गावांचा कारभार

By admin | Updated: June 19, 2014 00:08 IST

कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही कर्मचाऱ्यांची पदभरती केली जात नसल्याने विद्युत वितरण ्रकंपनी व शासनाच्या दुर्लक्षीत कारभारामुळे नागरीक मात्र त्रास भोगत आहेत. येथे २१ लाईन नमन

विद्युत विभागाचे दुर्लक्ष : पदभरतीची नागरिकांची मागणी
सालेकसा : कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही कर्मचाऱ्यांची पदभरती केली जात नसल्याने विद्युत वितरण ्रकंपनी व शासनाच्या दुर्लक्षीत कारभारामुळे नागरीक मात्र त्रास भोगत आहेत. येथे २१ लाईन नमन १५० गावांचा कारभार सांभाळत असल्याचे चित्र असून यामुळे नागरिकांना मिळावी तशी सुविधा उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.
सद्यस्थितीत १५ लाईनमनची पदे रिक्त आहेत. कित्येक वर्षापासून ही पदभरतीच झाली नाही. सालेकसा तालुक्यात सर्वाधिक सिंचनाची सोय आहे. तसेच पुजारीटोला व मानागढ धरणाचे पाणि असल्याने कनेक्शन घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी एखादे प्रकरण मंजूर झाल्यानंतर सदर प्रकरण कार्यालयातच धुळखात असते. वेळोवेळी तक्रार व निराकरण करण्यातच वेळ निघून जातो. या कार्यालयात कामे अधिक आणि पदे कमी असा कारभार झाला आहे.
सालेकसा तालुक्यात १० फिडर आहेत. त्यामध्ये तिरखेडी, दर्रेकसा, सालेकसा, साकरीटोला, नवेगाव, सोनपुरी, हेटीटोला, सोनेखारी, कावराबांध आणि एक एक्सप्रेस फिडर वाटर बॉक्स कोटरा यागावी असून कर्मचारी नसल्यामुळे खोळंबा होतो.
२१ लाईनमनकडे काही गावे आमगाव तर देवरी तालुक्यातील गावे सालेकसा उपविभागीय जोडले असून आमगाव तालुक्यातील जोडलेली गावे कवडी, अंजोरा, बोरकन्हार, चिमनटोला, पानगाव, कन्हारटोला, हलबीटोला, रामाटोला तर देवरी तालुक्यातील जोडलेली गावे हरदोली सोनेखारी, सोनारटोला, डोंगरगाव, सावली यांचा समावेश आहे.
तालुक्यात ३ महत्वपूर्ण फिडर आहेत. यामध्ये सालेकसा, दर्रेकसा, साकरीटोला हे महत्वपूर्ण फिडर आहेत. असे असतानाही सालेकसा येथेच भारनियमन आहे. दर्रेकसा नक्षलग्रस्त आदिवासी गावांमध्ये आजही काही गावे अंधारात तर काही जंगलव्याप्त गावात विद्युत पुरवठा नाही. तर काही गावात कित्येक वर्षापासून विद्युत चोरीचा तडाखा सुरू आहे. यावर अंकुश लावणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांना व सामान्य माणसाला विजेची गरज आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्यावर कायमस्वरूपी उपाय योजना करून तातडीने या कार्यालयातील रिक्त पदे भरण्यात यावी व तालुक्यातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आहे.
विद्युत विभागात लाईनमेनचे पद महत्वाचे असते. येथे मात्र २१ लाईनमेनवर १५० गावांचा कारभार देण्यात आल्याने त्यांचीही कोठे जाऊ कोठे नाही अशात त्यांची पंचाईत होते. याकडे विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)