शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

२०८२ गरजूंनी घेतला ‘जीवनदायी’चा लाभ

By admin | Updated: April 18, 2015 00:37 IST

दारिद्र्य रेषेखालील व गरजू नागरिकांना मोफत औषधोपचार, गंभीर स्वरुपाच्या शस्त्रक्रिया व आरोग्यविषयक सुविधा देण्याच्या ..

मोफत उपचार : अनेकांचे केले आॅपरेशनगोंदिया : दारिद्र्य रेषेखालील व गरजू नागरिकांना मोफत औषधोपचार, गंभीर स्वरुपाच्या शस्त्रक्रिया व आरोग्यविषयक सुविधा देण्याच्या उद्देशाने सन २०१३ मध्ये राज्य शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत मार्च २०१५ पर्यंत २०८२ रुग्णांनी उपचार करवून घेतले आहेत.दारिद्र्य रेषेखालील पिवळे, केशरी शिधापत्रिकाधारक, अंत्योदय व अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पात्र कुटुंबांना प्रतीवर्ष शस्त्रक्रिया किंवा उपचारासाठी १ लाख ५० हजार रुपयापर्यंत विमा संरक्षण देण्यात येते. जिल्ह्यात या योजनेचा लाभ कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, सेंट्रल रुग्णालय, गोंदिया केअर रुग्णालय व न्यू गोंदिया रुग्णालय येथे देण्यात येत असून यामध्ये ९७१ वेगवेगळ्या व गंभीर स्वरुपाच्या शस्त्रक्रिया व उपचाराचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात मार्च २०१५ पर्यंत २०८२ गरजुंनी या योजनेचा लाभ घेतला असून ५०० रुग्णांनी मेडिकल ओन्कोलॉजी, २६८ किडनी विकास, १६१ सर्जीकल, १५९ रेडिएशन, ११६ स्त्रीरोग व प्रसुती शस्त्रक्रिया, १३९ जनरल सर्जरी, ११० कार्डियाक सर्जरी उपचारांचा व इतर आजाराबाबतही नागरिकांनी लाभ घेतला.या योजनेतील उपचार पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे लाभार्थ्यांना आपातकालीन परिस्थितीत रोग व उपचार प्राप्त होतात. सर्व उपचार व परिक्षण पुराव्यावर आधारित आहेत. लाभार्थ्यांना रुग्णालयात मदत व सहाय्य होण्याच्या उद्देशाने आरोग्यमित्रांची व जिल्हा व्यवस्थापनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेवून निरोगी व निरामय जीवन जगावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिश कळमकर व जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)