२ लाख विद्यार्थी वाचणार २३ लाख पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 05:00 AM2019-10-15T05:00:00+5:302019-10-15T05:00:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : दप्तर विरहीत दिन व वाचन आनंद दिन म्हणून गोंदिया जिल्ह्याने सुरूवात केली. या उपक्रमाला ...

2 lakh students will read 23 lakh books | २ लाख विद्यार्थी वाचणार २३ लाख पुस्तके

२ लाख विद्यार्थी वाचणार २३ लाख पुस्तके

googlenewsNext
ठळक मुद्देआज ‘वाचन प्रेरणा’ दिन : जिल्ह्यातील १६३३ शाळा सहभागी होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दप्तर विरहीत दिन व वाचन आनंद दिन म्हणून गोंदिया जिल्ह्याने सुरूवात केली. या उपक्रमाला अख्या महाराष्ट्रात राबविण्यात आले. १५ ऑक्टोबर रोजी एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणादिन म्हणून साजरी केली जाते. यात यंदा जिल्ह्यातील २ लाख विद्यार्थी २३ लाख पुस्तकांचे वाचन करून डॉ. कलाम यांना अभिवादन करणार आहेत.
गोंदिया जिल्ह्याने सुरू केलेल्या वाचन आनंद दिन कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाने माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती (१५ ऑक्टोबर) वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले. त्यानुसार, गोंदिया जिल्ह्यातील १६३३ शाळेत हा दिवस साजरा करण्यात आला.यात २ लाख विद्यार्थी २३ लाख पुस्तकांचे वाचन करणार आहेत.यांतर्गत, एका विद्यार्थ्याने किमान १० पुस्तकांचे वाचन करावे लागणार आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याने सरासरी १० पुस्तकांचे वाचन करण्यासाठी शाळांमध्ये पुस्तके ठेवण्यात आली होती. काही शाळांमध्ये टॅब व संगणकाद्वारे ऑनलाईन पद्धतीने अधिकृत पुस्तक अ‍ॅप्स उपलब्ध करुन पुस्तकांचे वाचन करण्यात येणार आहे. जेथे पुस्तके कमी जाण्याची शक्यता होती त्या ठिकाणी सार्वजनिक ग्रंथालय, शिक्षणप्रेमी, युवक मंडळे, शिक्षक यांच्या माध्यमातून पुस्तके उपलब्ध करण्यात येतील. जिल्ह्यात १५ ऑक्टोबर रोजी सर्व शाळांमध्ये सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते व नियोजनानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने किमान १० (१६ पुष्ठे) पुस्तकांचे वाचन करावे लागणार आहे.
कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी व्हावी याकरिता शिक्षण विभागाने केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना नियोजनाप्रमाणे सहकार्य करणे अनिवार्य केले असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: 2 lakh students will read 23 lakh books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.