शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
5
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
6
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
7
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
8
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
9
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
10
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
11
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
12
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
13
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
14
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
15
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
16
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
17
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
18
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
19
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
20
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
Daily Top 2Weekly Top 5

७६ जागांसाठी १७२५ उमेदवार पात्र

By admin | Updated: June 15, 2014 23:36 IST

जिल्ह्यातील ७६ जागांसाठी ४ हजार २४७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यातील ३ हजार १३४ उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. या चाचणीत १ हजार ७२५ उमेदवार शारीरिक चाचणीत पात्र ठरले तर

१११३ उमेदवार गैरहजर : ३१३४ उमेदवारांनी दिली शारीरिक चाचणी
गोंदिया : जिल्ह्यातील ७६ जागांसाठी ४ हजार २४७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यातील ३ हजार १३४ उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. या चाचणीत १ हजार ७२५ उमेदवार शारीरिक चाचणीत पात्र ठरले तर १ हजार २९५ अपात्र ठरले आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे व काहींनी दोन ठिकाणी अर्ज सादर केल्यामुळे १ हजार ११३ उमेदवार गैरहजर राहिले आहेत.
६ ते १४ जून दरम्यान घेण्यात आलेल्या पोलीस भरतीत ४ हजार २४७ तरूणांनी अर्ज दाखल केले होते. ६ जून रोजी ३०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यात १६० उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. १४० उमेदवार गैरहजर होते. यात ८० पात्र तर ६५ अपात्र ठरले. ७ जून रोजी ४५० उमेदवारांना बोलावण्यात आले होते.
यात ३१४ उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. १३६ उमेदवार गैरहजर होते. यात १७६ पात्र तर ११८ अपात्र ठरले. ८ जून रोजी ५०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यात ४०१ उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. ९९ उमेदवार गैरहजर होते. यात २८७ पात्र तर १०० अपात्र ठरले. ९ जून रोजी ६०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यात ४८२ उमेदवारांनी शारिरीक चाचणी दिली. ११८ उमेदवार गैरहजर होते. यात २९७ पात्र तर १७२ अपात्र ठरले.
१० जून रोजी ६५० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यात ४६९ उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. १८१ उमेदवार गैरहजर होते. यात २७२ पात्र तर १८० अपात्र ठरले. ११ जून रोजी ४३० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यात २८१ उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. १४९ उमेदवार गैरहजर होते. यात १३२ पात्र तर १३६ अपात्र ठरले. १२ जून रोजी ५०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यात ४१४ उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. ८६ उमेदवार गैरहजर होते. यात १७० पात्र तर २२९ अपात्र ठरले. १३ जून रोजी ५०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यात ४०६ उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. ९४ उमेदवार गैरहजर होते. यात १८७ पात्र तर २१२ अपात्र ठरले. १४ जून रोजी ३१७ उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यात २०७ उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. ११० उमेदवार गैरहजर होते. यात १२४ पात्र तर ८३ अपात्र ठरले.
या नऊ दिवसांच्या कालावधीत ५ हजार २४७ उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यात ३ हजार १३४ उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. यात १ हजार ११३ उमेदवार गैरहजर राहीले. तर एक हजार ७२५ उमेदवार शारीरिक चाचणी पात्र तर १ हजार २९५ उमेदवार अपात्र ठरले. पोलीस अधिक्षकांनी जिल्ह्यासाठी ३८० जागांची मागणी केली होती. मात्र शासनाने जिल्ह्याला फक्त २३ जागा दिल्या आहेत. त्यामुळे सर्वात कमी जागा जिल्ह्यात आहेत.
(तालुका प्रतिनिधी)