शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत वणव्याच्या १७१ घटना

By admin | Updated: April 19, 2017 00:11 IST

वनसंपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात वनांना आग लावण्याचे प्रमाण मोठे आहे. जंगलात आग लागू नये यासाठी

२७० हेक्टर जंगल जळाले : फायर लाईनचे २७ लाख पाण्यात नरेश रहिले  गोंदिया वनसंपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात वनांना आग लावण्याचे प्रमाण मोठे आहे. जंगलात आग लागू नये यासाठी वनविभागाला सर्तक राहण्याचा इशारा दिला जातो. परंतु वनाधिकारी, कर्मचारी सतर्क राहूनही १५ फेब्रुवारी पासून ९ एप्रिल या दोन महिन्यापेक्षा कमी काळात गोंदिया जिल्ह्यात वणव्याच्या १७१ घटना घडल्या आहेत. त्यात २७०.४३२ हेक्टर जंगल जळाले आहे. वनांना आग लागू नये यासाठी वनविभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. त्या वनांचे मालकत्व गावकऱ्यांनीच पत्करावे यासाठी ग्रामवनची संकल्पना पुढे आणण्यात आली. तरी देखील गोंदिया जिल्ह्यातील वनांना आग लागण्याच्या घटना कमी होतांना दिसत नाही. फेब्रुवारी महिन्यात नवेगावबांध जंगलात चार ठिकाणी आग लागली व त्यात चार हेक्टर जंगल जळाले. अर्जुनी-मोरगाव व आमगाव येथे वणव्याची प्रत्येकी एक घटना असून त्यात प्रत्येकी एक हेक्टर जंगल जळाले. मार्च महिन्यात गोरेगाव क्षेत्रात एका घटनेत दोन हेक्टर जंगल जळाले. तिरोडा क्षेत्रात सात घटनांत ४.७५ हेक्टर, आमगाव क्षेत्रात दोन घटनांत सहा हेक्टर, उत्तर देवरी क्षेत्रात १३ घटनांत १७.५० हेक्टर, गोठणगाव क्षेत्रात १९ घटनांत २५.४० हेक्टर, चिचगड क्षेत्रात २२ घटनांत २१.९६८ हेक्टर, नवेगावबांध क्षेत्रात २७ घटनांत ३५.५० हेक्टर, दक्षीण देवरी क्षेत्रात १० घटनांत १९.७० हेक्टर, अर्जुनी-मोरगाव क्षेत्रात १३ घटनांत २३.०५ हेक्टर, सालेकसा क्षेत्रात नऊ घटनांत १९.०५ हेक्टर, सडक-अर्जुनी क्षेत्रात तीन घटनांत १२.९५ हेक्टर, गोंदिया क्षेत्रात सहा घटनांत ४.५०० हेक्टर वनांना आग लागली. एप्रिल महिन्यात तिरोडा क्षेत्रात चार घटनांत पाच हेक्टर, सडक-अर्जुनी क्षेत्रात सात घटनांत ३१.८६ हेक्टर, अर्जुनी-मोरगाव क्षेत्रात पाच घटनांत १३ हेक्टर, गोंदिया क्षेत्रात दोन घटनांत ३.५० हेक्टर, गोठणगाव क्षेत्रात दोन घटनांत ३.२५ हेक्टर, नवेगावबांध क्षेत्रात पाच घटनांत ६.५० हेक्टर, चिचगड क्षेत्रात दोन घटनांत ०.९५४ हेक्टर, सालेकसा क्षेत्रात दोन घटनांत ४.२० हेक्टर, दक्षीण देवरी क्षेत्रात पाच घटनांत ३.८० हेक्टर वनांना आग लागली. ९ एप्रिल नंतर लागलेल्या आगींची माहिती वनविभागाला अजून उपलब्ध झालेली नाही. नुकसानीची लपवाछपवी आगीत किती वनसंपदेचे नुकसान झाले यासंदर्भात विचारणा केली असता वनाधिकारी व कर्मचारी नुकसानीचा आकडा लपवितात. आपल्या विभागावर खापर फोडले जाऊ नये यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीत फक्त पाला-पाचोळा जळाल्याची माहिती देतात. मात्र नुकसानीची खरी माहिती शासनालाही पोहचत नाही. वनाधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ नये या भितीने नुकसान दाखविले जात नाही. फायर लाईनचे २७ लाख गेले कुठे? जंगलात आग लागू नये याकरिता फायर लाईन कापण्यासाठी शासनाकडून सर्व विभागाला निधी दिला जातो. परंतु हा निधी वनाधिकारी हडपत असल्याने वनांना आग लागण्याच्या घटना घडतात. गोंदिया जिल्ह्याला फायरलाईन करीता एकदा १० लाख रूपये व दुसऱ्यांदा १७ लाख ५६ हजार रूपये देण्यात आले. हे पैसे संबधित वनाधिकाऱ्यांना वाटप करण्यात आले असतांनाही आग लागतात कशा हे न सुटणारे कोडे आहे.