शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १७०० तलाठ्यांची पदे भरली जाणार; डिसेंबरअखेरीस भरती प्रक्रिया होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 20:16 IST

रिक्त पदांमुळे येत होत्या अडचणी : तलाठी संघटनेने सुद्धा वेधले होते भरतीकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
राज्याच्या महसूल विभागातील तलाठ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. सध्या तलाठ्यांच्या संख्येपेक्षा कामाचे प्रमाण जास्त असल्यामुळे एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे. त्यामुळे नागरिकांना कागदपत्रांची कामे वेळेत मिळत नाहीत. मात्र, डिसेंबरअखेरीस राज्यातील तलाठ्यांच्या १७०० पेक्षा जास्त रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. भरती झाल्यानंतर तलाठ्यांवरील कामाचा ताण कमी होईल, तसेच नागरिकांची कामे वेळेत मार्गी लागतील. ही भरती स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठीही मोठा दिलासा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा

महसूल विभागातील पात्र सेवकांसाठीही राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांना याचा लाभहोणार आहे.

डिसेंबरअखेरीस तलाठ्यांची १७०० पदे भरणार

राज्यातील तलाठ्यांच्या १७०० रिक्त पदांची भरती डिसेंबरअखेरीस सुरू होण्याबाबत चर्चा सुरू आहे. पदभरतीमुळे कामाचा ताण कमी होईल आणि तलाठ्यांवर नागरिकांच्या कामाचा प्रेशर कमी होईल.

'पेसा' क्षेत्रात कंत्राटी नियुक्ती

'पेसा' क्षेत्रातील गावांमध्ये कामकाज सुरळीत करण्यासाठी कंत्राटी तलाठ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना तातडीने सुविधा मिळतील.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना दिलासा

मागील अनेक दिवसांपासून तलाठी भरती होत नसल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण भरतीची प्रतीक्षा करीत आहेत. आता तलाठ्याच्या जागा निघाल्या तर त्यांना दिलासा मिळणार आहे.

तलाठ्यांची पदे रिक्त

जिल्ह्यातही तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. एका तलाठ्याकडे दोन सज्जाचा कारभार दिला आहे. ही भरती प्रक्रिया झाल्यास जिल्ह्यातील रिक्त पदे भरली जाणार आहेत.

नागरिकांची कामे वेगाने मार्गी लागणार

तलाठ्याकडे नेहमीच शेतकरी, नागरिकांचे कामे पडत असतात. मात्र, एका तलाठ्याकडे दोन ते तीन सज्जे असल्याने ते दररोज येऊ शकत नाही. परिणामी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, जागा भरल्याने जमीन, महसूल, कागदपत्रे आणि इतर सरकारी कामे आता वेगाने पूर्ण होतील. 

एका तलाठ्याकडे तीन तीन सज्जे

सध्या एका तलाठ्याकडे दोन ते तीन सज्जांची जबाबदारी दिली आहे. परिणामी, तलाठ्यांना कर्तव्य बजावताना मोठी दमछाक होत आहे. नवीन भरतीमुळे प्रत्येक तलाठ्याचे काम हलके होईल. 

"मागील बऱ्याच दिवसांपासून आज ना उद्या जागा निघतील, या आशेवर स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहोत. तलाठ्यांच्या जागा निघतील अशी चर्चा आहे. पण प्रत्यक्षात जाहिरात निघून प्रामाणिक भरती होईल तेव्हाच खरे. आमचे प्रयत्न सुरू आहेत."
- सुभाष थेर, युवक

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra to Fill 1700 Talathi Posts; Recruitment Starts December End

Web Summary : Maharashtra's Revenue Department will begin recruiting for over 1700 Talathi positions by December end. This recruitment will ease the burden on current Talathis and expedite citizens' work. Reserved positions are available for revenue servants. This provides relief to young people preparing for competitive examinations.
टॅग्स :GovernmentसरकारjobनोकरीMaharashtraमहाराष्ट्र