१२ झाले बरे तर २२ रुग्णांची पडली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 05:00 AM2020-08-04T05:00:00+5:302020-08-04T05:00:23+5:30

जिल्ह्यात रविवारी (दि.२) एकाच दिवशी रेकार्ड ब्रेक ६० कोरोना बाधितांची नोंद झाली. त्यानंतर सोमवारी पुन्हा २२ कोरोना बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा १५६ वर पोहचला आहे. तर सोमवारी १२ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा २४२ वर पोहचला आहे.

12 were cured and 22 patients were admitted | १२ झाले बरे तर २२ रुग्णांची पडली भर

१२ झाले बरे तर २२ रुग्णांची पडली भर

Next
ठळक मुद्देगोंदियात वाढले रुग्ण : ९१८५ स्वॅन नमुने कोरोना निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून सोमवारी (दि.३) जिल्ह्यात पुन्हा २२ रुग्णांची भर पडली.यात सर्वाधिक १५ रूग्ण हे गोंदिया येथील आहे. त्यामुळे गोंदिया शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांना काळजी घेण्याची गरज आहे. कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले १२ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात रविवारी (दि.२) एकाच दिवशी रेकार्ड ब्रेक ६० कोरोना बाधितांची नोंद झाली. त्यानंतर सोमवारी पुन्हा २२ कोरोना बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा १५६ वर पोहचला आहे. तर सोमवारी १२ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा २४२ वर पोहचला आहे. सोमवारी आढळलेल्या २२ कोरोना बाधितांमध्ये गोंदिया येथील १५ रुग्णांचा समावेश आहे. यात सिंधी कॉलनी ९, हनुमाननगर १, श्रीनगर १, रेलटोली १, दोन रुग्ण हे सिंगापूर आणि बिहार येथून आले आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे २, सालेकसा १, देवरी २, तिरोडा १ आणि आमगाव तालुक्यातील चिरचाळबांध १ अशा एकूण २२ रुग्णांचा समावेश आहे. मागील तीन दिवसांपासून गोंदिया शहरातील कोरोना बाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत असल्याने शहरवासीयांनी काळजी घेण्याची गरज आहे.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत प्रयोगशाळेत एकूण ९८०७ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यात ४०८ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.तर ९१८५ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. ९४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. तर १३८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्यापही अनिश्चित आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट घेतल्या जात आहे. यातंर्गत आतापर्यंत २५७९ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १४ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. तर २५५५ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.

नागरिकांनो घ्या स्वत:ची काळजी
मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, मास्कचा नियमित वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे. आरोग्य विभाग आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी.


देवरी शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना
मागील तीन चार दिवसांपासून देवरी येथे कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासनाने काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे. देवरी येथील बाजारपेठ गुरूवार, शुक्रवार आणि मंगळवारी पूर्ण दिवसभर बंद राहणार आहे.तर इतर दिवशी बाजारपेठ सकाळी ९ ते दुपारी या कालावधीत सुरू राहणार आहे.

Web Title: 12 were cured and 22 patients were admitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.