शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

१२ दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: September 21, 2014 23:53 IST

जिल्हा पोलिसांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी धाड घालून १२ विक्रेत्यांना गुरूवारी अटक केली.

गोंदिया : जिल्हा पोलिसांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी धाड घालून १२ विक्रेत्यांना गुरूवारी अटक केली. आमगाव पोलिसांनी मानेगाव येथील ईश्वरदास होलीराम तिरपुडे (५५) याचकडून पाच देशी दारूचे पव्वे, ठाणा येथील शोभाराम मिनाराम उके (४२) याचकडून सहा नग देशी दारूचे पव्वे, टाकरी येथील राधेलाल बाबुलाल बिसेन (३९) व सितेपार येथील गोरेलाल मनिराम चौधरी (४५) या दोघांजवळून १० हजार ७२५ रुपयाची इंग्रजी दारू व एमएच ३४/डब्ल्यु-१३८६ ही मोटारसायकल जप्त केली. मोटारसायकलची किंमत २० हजार रुपये सांगीतली जाते. या प्रकरणात पोलिसांनी ३० हजार ७२५ रुपयाचा माल जप्त केला आहे. गोंदिया शहर पोलिसांनी फुलचूरच्या सहायता नगरातील विनायक परसराम सिडाम (३५) याचकडून १५ लिटर मोहफुलाची दारू, सहा नग देशी दारूचे पव्वे जप्त केले. गंगाझरी पोलिसांनी जुनेवानी येथील अंबिलाल ब्रिजलाल मरस्कोल्हे (४१) याचकडून पाच लिटर हातभट्टीची दारू, सहारवाणी येथील रुपचंद उर्फ शिवा दुधा राऊत (४८) याचकडून पाच लिटर हातभट्टीची दारू, तिरोडा पोलिसांनी सुकडी येथील देवराम नारायण शेंडे (४७) याचकडून ५० लिटर हातभट्टीची दारू, २० पोत्यांमध्ये मोहफुल व दारू गाळण्याचे साहित्य असा १३ हजार ११० रुपयाचा माल, तिरोडाच्या संत रविदास वॉर्डातील शकुंतला कुवरलाल बिंझाडे (६०) या महिलेकडून १० लिटर हातभट्टीची दारू, अकिल खा रहिम खा पठाण (४२) याचकडून ५० लिटर हातभट्टीची दारू व दारू गाळण्याचे साहित्य असा ७ हजार ८०० रुपयाचा माल जप्त केला. रावणवाडी पोलिसांनी राजेश रुपलाल लिल्हारे (३३) रा. रावणवाडी याचकडून ८ देशी दारूचे पव्वे जप्त केले. डुग्गीपार पोलिसांनी सिंदीपार येथील हेमराज केवटराम रामटेके (३६) याचकडून चार देशी दारूचे पव्वे जप्त केले. सदर बाराही आरोपीवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)