शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा तालुक्यात २ वर्षांत १ हजार ६९० घरकूल मंजूर

By admin | Updated: June 23, 2014 00:11 IST

तिरोडा तालुक्यात दोन वर्षात रमाई, इंदिरा आणि राजीव गांधी या तीन योजनेंतर्गत १ हजार ६९० घरकूल मंजूर करण्यात आले आहेत. सन २०१२-१३ मध्ये १ हजार ३७७ घरकूल मंजूर करण्यात आले होते.

काचेवानी : तिरोडा तालुक्यात दोन वर्षात रमाई, इंदिरा आणि राजीव गांधी या तीन योजनेंतर्गत १ हजार ६९० घरकूल मंजूर करण्यात आले आहेत. सन २०१२-१३ मध्ये १ हजार ३७७ घरकूल मंजूर करण्यात आले होते. मात्र २०१३-१४ करिता इंदिरा आवास योजनेचे २३३ घरकूल मंजूर करण्यात आले आहेत. रमाई योजनेंतर्गत सन २०१२-१३ मध्ये ७३२, इंदिरा आवास योजनेच्या २३६ व राजीव गांधी आवास योजनेच्या ४०९ घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती.
बीपीएल धारकांना आणि गोरगरिबांना निवाऱ्याची सोय व्हावी याकरिता केंद्र शासन व राज्य शासनाने घरकुलाची योजना आखली. या योजनेतून काही लोकांना राहण्याची सोय झाली. तर काही प्रमाणात या योजनेचा दुरुपयोगही करण्यात आला आहे. रमाई योजना, इंदिरा आवास योजना आणि राजीव गांधी अशा तीन योजनेतून घरकूल मंजूर केले जातात. घरकुलाकरिता मंजूर निधीपैकी सर्वाधिक कमी निधी इंदिरा आवासची होती.
त्यात शासनाने वाढ करुन एक लाख केली आहे. ही वाढ एप्रिलच्या नंतरकरिता न ठेवता आर्थिक वर्ष २०१२-१३ व २०१३-१४ करिता असावी, अशी मागणी जनतेने केली आहे.
आवास योजनेला देण्यात येणारी निधी सर्वाधिक कमी इंदिरा आवास योजनेतून ६८ हजार, रमाई योजनेतून ७० हजार आणि राजीव गांधी योजनेतून ६८ हजार ५०० एवढी होती. २०१३-१४ या आर्थिक वर्षात इंदिरा आवासच्या निधीत ३२ हजारांनी वाढ करुन एक लाख रूपये करण्यात आले आहेत. करण्यात आलेली वाढ २०१४ च्या एप्रिल नंतरच्या लाभार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र असे करणे न्यायसंगत होणार नसून २०१२-१३ पासून लाभार्थ्यांना देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रमाई योजनेंतर्गत घरकुलांची मंजुरी समाज कल्याण विभाग देते. इंदिरा आवासची जि.प. आणि राजीव गांधी आवास योजनेच्या घरकुलाची मंजुरी पालकमंत्री देतात. या वर्षाला रमाई व राजीव गांधी योजनेतून एकही घरकुल मंजूर करण्यात आले नाहीत. तिरोडा लालुक्यात १६९० घरकुलांपैकी ७० टक्के घरकूल पूर्ण झाल्याची माहिती स्थापत्य अभियंता यु.एन. बिसेन यांनी सांगितली आहे.
रमाई योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या बीपीएल धारकांना देण्यात येणाऱ्या घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ज्यांचे नाव बीपीएलमध्ये नाहीत असे काही नागरिक आहेत की ज्यांना राहण्याची मुद्दामच सोय नाही. या व्यतिरिक्त इतर प्रवर्गातसुद्धा अनेक कुटुंब आहेत की त्यांना घरे नाहीत. त्यांना निवाऱ्याची सोय त्वरित उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)