शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दोघा अल्पवयीन मुलांनी केला तरुणाचा खून

By admin | Updated: June 27, 2014 01:36 IST

सावर्डे : दोन अल्पवयीन मुलांनी तरुणाचा पूर्ववैमनस्यातून खून केल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. सावर्डे, गुड्डेमळ येथील प्रशाल प्रदीप देवीदास (२२, रा. गुड्डेमळ) असे मृताचे नाव आहे.

सावर्डे : दोन अल्पवयीन मुलांनी तरुणाचा पूर्ववैमनस्यातून खून केल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. सावर्डे, गुड्डेमळ येथील प्रशाल प्रदीप देवीदास (२२, रा. गुड्डेमळ) असे मृताचे नाव आहे. संशयितांची रवानगी उद्या अपना घर येथे करण्यात येणार आहे. कुडचडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशाल १५ जूनला संध्याकाळपासून बेपत्ता होता. त्याच्या वडिलांनी, मित्रमंडळींनी १५ जूनला चौकशी केली आणि १७ रोजी पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात २४ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास फोनवरून एका मृतदेहाबाबत माहिती मिळाली. गुड्डेमळ येथील दाट जंगलात हा मृतदेह कुजलेला होता. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान होते. मृतदेहाजवळ कमरेचा पट्टा सापडला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. आपला संशय येऊ नये यासाठी खून करणाऱ्यांनीच गावात जाऊन जंगलात मृतदेह दिसल्याची माहिती प्रथम दिली. गावातील एकाने पोलिसांना फोन केला. विशेष म्हणजे मृतदेहाचा पोलीस पंचनामा करीत होते, तेव्हा संशयित मृतदेहाजवळ होते. आपण बांबूची झाडे कापण्यासाठी जंगलातून जाताना मृतदेह पाहिल्याची माहिती त्यांनी दिली होती. पोलिसांनी सुमारे २० जणांचे जबाब घेतले, पैकी १० नोंद केले. संशयितांची चार दिवसांपासून कसून चौकशी सुरू होती. अखेर ते आज संध्याकाळी कबूल झाले. काही कारणावरून प्रशालच्या घरी भांडण सुरू होते. त्यात संशयितांनी मध्यस्थी केलेली. तेव्हा प्रशाल याने संशयितांना मारलेले. त्याचा काटा काढण्याचा या मुलांचा डाव होता. रविवारी १५ जून रोजी प्रशाल दारूच्या नशेत घराकडे जाताना वाटेत संशयित भेटले आणि त्याला जंगलात घेऊन गेले. तेथे संशयितांनी त्याच्याच कमरेचा पट्टा त्याच्या गळ््यात आवळून खून केला आणि पसार झाले. यानंतर एका संशयिताने दुसऱ्या संशयिताला माहिती उघड केल्यास ठार मारण्याची धमकीही दिलेली. (प्रतिनिधी)