शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
8
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
9
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
12
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
13
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
14
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
15
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
16
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
17
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
18
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र राखीवक्षेत्राची आवश्यकता नाही; मंत्री सुभाष फळदेसाई यांनी मांडले मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 13:51 IST

वाघाच्या रक्षणासाठी राज्यात व्याघ्र राखीव क्षेत्राची आवश्यकता नाही, असे मत समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: वाघ हा सांगे परिसरातील लोकांसाठी दैवत समान आहे. वाघाची हत्या झाली असेल आणि त्याच्या अवयवांची जर तस्करी झाली असेल, तर त्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. वाघांच्या रक्षणासाठी आमचे सरकार नेहमीच कटिबद्ध राहिले आहे. पण, वाघाच्या रक्षणासाठी राज्यात व्याघ्र राखीव क्षेत्राची आवश्यकता नाही, असे मत समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

फळदेसाई यांनी यावेळी सांगितले की, व्याघ्र राखीव क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांचे स्थलांतर करावे लागणार. त्यामुळेच आमचा व्याघ्र क्षेत्राला विरोध आहे. दहा ते वीस हजार लोकांचे स्थलांतर यासाठी करावे लागणार आहे, त्यामुळे व्याघ्र राखीव क्षेत्राबाबतचा निर्णय पुनर्विचार करण्यासारखा आहे. आम्ही वाघ नको, असे म्हणत नाही, आम्हाला वाघ हवेत. ते जसे आतापर्यंत मुक्तपणे फिरत होते, तसेच त्यांना राहू द्यावे. मात्र अर्धा गोवा व्याघ्र संरक्षित क्षेत्र करून स्थानिकांनास्थलांतरित करणे योग्य नाही.

स्थानिक लोक व्याघ्र संरक्षित क्षेत्राची मागणी करत नाही. जे शहरात आरामात एसीमध्ये बसून राहतात तेच व्याघ्र संरक्षित क्षेत्राची मागणी करत सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांना त्यांच्या राहत्या जागेवरून न हलविता वाघांचे संरक्षण करण्यासाठी कडक कायदे लागू करण्यावर आमचे सरकार भर देत आहे, असेही फळदेसाई यांनी पुढे सांगितले.

मृत वाघाच्या घटनेवर अधिक बोलताना फळदेसाई यांनी सांगितले की, वाघाला मारणे हा गुन्हा आहे आणि अशा प्रकारांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. वाघांचे अस्तित्व गावागावात असून त्यांची पूजा केली जाते, त्यामुळे वाघांविरोधात नसून त्यांच्या संरक्षणाला पूर्ण पाठिंबा आहे. वाघांची तस्करी किंवा शिकार करणाऱ्यांवर कठोर निर्बंध आणि कारवाई करण्यात यावी यासाठी मी मुख्यमंत्र्याकडे मागणी करणार आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : No Tiger Reserve Needed: Minister Phal Desai Voices Opinion

Web Summary : Minister Phal Desai opposes tiger reserve in Goa, citing displacement of locals. He emphasizes strict action against poaching and supports tiger conservation through stringent laws without relocating communities. He also mentioned that villagers worship tigers and want strict action against poachers.
टॅग्स :goaगोवाTigerवाघPoliticsराजकारणforestजंगलforest departmentवनविभाग