देवी लईराईच्या हजारो व्रतस्थ धोंडानी साकारले अग्निदिव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 09:35 IST2026-04-23T09:34:16+5:302026-04-23T09:35:11+5:30

शिरगावमध्ये प्रशासनाच्या उत्तम व्यवस्थेवर भाविक खुश

thousands of devotees of goddess lairai created a divine fire lairai devi jatra 2026 | देवी लईराईच्या हजारो व्रतस्थ धोंडानी साकारले अग्निदिव्य

देवी लईराईच्या हजारो व्रतस्थ धोंडानी साकारले अग्निदिव्य

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील देवी लईराईचा जत्रोत्सव उत्साही वातावरणात संपन्न झाला. पहिल्या दिवशी, मंगळवारी मध्यरात्री हजारो धोंडांनी मध्यरात्री अग्निदिव्य साकारले. हा सोहळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येथे ठिकाणी जमले होते.

जिल्हा प्रशासनाने विविध निर्बंध लागू करून जत्रोत्सवाचे नेटके नियोजन केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी व सरकारी यंत्रणेने देवस्थान समितीच्या मदतीने समन्वय राखला. चोख व्यवस्था केल्याने कोणत्याही प्रकारची गडबड, गोंधळ झाला नाही. भाविकांना व्यवस्थित देवदर्शन, होमकुंडाच्या ठिकाणी रांगेत दर्शन घेण्याची सोय करण्यात आली होती.

डिचोलीचे पोलिस निरीक्षक विजय राणे व त्यांची टीमने नियोजन केले. पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मामलेदार, अग्निशामक दल व इतर संबंधित सहकाऱ्यांनी जबाबदारी पार पाडल्याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आमदार प्रेमेंद्र शेट यांनी कार्याचे अभिनंदन केले.

भाविकांना त्रास होऊ नये यासाठी आमदार शेट सातत्याने शिरगावात दाखल होऊन आढावा घेत होते. गेल्यावर्षीची दुर्घटना लक्षात घेऊन जत्रा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही कार्यरत होतो. त्यामुळे पहिल्या दिवशी कोणतीही गडबड झाली नाही असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काल पहिल्या दिवशी मध्यरात्री अग्निदिव्य साकारल्यानंतर बुधवारपासून देवीच्या कौलत्सवास प्रारंभ झाला. गावातील प्रत्येक घरात देवी कौल देणार असल्याने आगामी चार दिवस हजारोंच्या संख्येने भाविक शिरगावमध्ये दाखल होतील. सर्वांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

Web Title : देवी लईराई जत्रा में हजारों भक्तों का अग्निदिव्य

Web Summary : शिरगाँव में देवी लईराई की वार्षिक जत्रा धूमधाम से मनाई गई। हजारों भक्तों ने अग्निदिव्य में भाग लिया। जिला प्रशासन ने सुरक्षा और भीड़ प्रबंधन के साथ सुचारू कार्यवाही सुनिश्चित की। भक्त आगामी कौलोत्सव के लिए एकत्रित होंगे।

Web Title : Thousands of devotees perform fire ordeal at Devi Lairai Jatra

Web Summary : The annual Jatra of Devi Lairai at Shirgaon was celebrated with fervor. Thousands of devotees participated in the fire ordeal. District administration ensured smooth proceedings, with tight security and crowd management. Devotees will gather for the upcoming Kaulotsav.