शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना यश; दूध दरवाढ मंजूर, गायीच्या दुधाला ६ रु. तर म्हशीच्या दुधाला १० रुपयांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 10:26 IST

ग्राहकांवर कोणताही भार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : सरकारने शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे दुग्ध उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर ६ रुपये, तर म्हशीच्या दुधासाठी १० रुपयांची वाढ देण्यात येणार असल्याची माहिती भारतीय किसान संघाचे अध्यक्ष संजीव कुंकळ्येंकर यांनी दिली. ही दरवाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे.

फोंडा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कुंकळ्येंकर म्हणाले की, संघटनेने गायीच्या दुधासाठी १० रुपये व म्हशीच्या दुधासाठी १५ रुपयांची वाढ मागितली होती. त्यापैकी सरकारने अनुक्रमे ६ व १० रुपयांची वाढ मंजूर केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय टिकवण्यासाठी व पुढे नेण्यासाठी मोठा आधार मिळेल.

म्हशीच्या दुधाला ७८.४० रुपये मिळणार

नवीन दरानुसार, गायीच्या दुधाला प्रतिलिटर ४० रुपये दर मिळणार असून त्यावर ४० टक्के आधारभूत किंमत मिळून एकूण ५६ रुपये मिळतील. म्हशीच्या दुधासाठी ५६ रुपये दर असून ४० टक्के आधारभूत किंमत मिळून ७८.४० रुपये मिळणार आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत या विषयावर चर्चा झाली होती. शेतकऱ्यांच्या मागण्यांना प्राधान्य देत दरवाढ जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री यांचे आभार कुंकळ्येकर यांनी मानले. राज्यभरातील शेतकऱ्यांनी दूध दरवाढीसह इतर मागण्यांसाठी आंदोलनही केले होते.

दरवाढीचा भार सरकार उचलणार आहे. आधारभूत किंमतीची रक्कम महिन्याच्या २० तारखेला थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. याबाबतची घोषणा २२ मे रोजी गोवा डेअरी संकुलातून करण्यात येणार आहे.

कामधेनू योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २० गायी खरेदी करता येणार आहेत. पहिल्या १० गायींसाठी २० हजार रुपये खरेदी दरावर २० टक्के अनुदान, तर उर्वरित १० गार्गीसाठी ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. सुधारित योजना ७ जूनपासून लागू होणार आहे.

कामधेनू योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पशुसंवर्धन खात्याला दिले आहेत. पशुपालन योजनेतील थकीत रक्कम वेळेवर मिळावी, यासाठीही उपाययोजना करण्यात येणार आहेत. 

योजनेचा लाभ घेण्यासाठी ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील शपथपत्राची अट काही शेतकऱ्यांसाठी अडथळा ठरत असल्याची बाबही पुढे आली असून, यावर सरकार सकारात्मक भूमिका घेईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच, गोवा डेअरीचा कारभार पाच वर्षांसाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे सोपवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती कुंकळ्येंकर यांनी दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Dairy Farmers Win: Milk Price Hike Approved by Goa Government

Web Summary : Goa government approves milk price hike: ₹6/liter for cow, ₹10/liter for buffalo milk, effective April 1st. Farmers hail the decision, ensuring business sustainability. Further, Kamdhenu scheme provides subsidies for cow purchases. The increased rates will be borne by the government.
टॅग्स :goaगोवाmilkदूधMilk Supplyदूध पुरवठा