शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या आगमनाची जोरदार तयारी

By admin | Updated: June 13, 2014 07:04 IST

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या शनिवारी गोव्यात येत आहेत.

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या शनिवारी गोव्यात येत आहेत. त्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षात उत्साह व चैतन्याचे वातावरण आहे. पंतप्रधानांच्या आगमनाची शासकीय व पक्षीय स्तरावरही जोरदार तयारी सुरू आहे. उद्या सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी दाबोळी विमानतळावर पंतप्रधानांचे आगमन होईल. त्यानंतर ते वास्को येथील नौदलाच्या आयएनएस तळावर दाखल होतील. नौदलाच्या किनाराधिष्ठित चाचणी सेवेचे त्यांच्या हस्ते उद्घाटन केले जाईल. ही सेवा आशिया खंडात पहिल्यांदाच आणण्यात आली आहे. त्यानंतर पंतप्रधान विक्रमादित्य जहाजालाही भेट देणार आहेत. दुपारी दीड वाजता पंतप्रधान वास्कोहून दोनापावल येथील राजभवनावर दाखल होतील. राजभवनाच्या प्रवेशद्वारासह अन्यत्र रंगरंगोटी करण्याचे काम सध्या सुरू आहे. सायंकाळी दोनापावल येथील गोवा विद्यापीठाजवळील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये पंतप्रधान मोदींकडून भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाईल. एकूण अकरा हजार कार्यकर्त्यांना बसण्याची सोय स्टेडियममध्ये करण्यात आली आहे. भाजपच्या मंत्री व आमदारांना मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणण्याचे काम प्रदेश भाजपने दिले आहे. कला अकादमीत सायंकाळी साडेचार वाजता प्रस्तावित चौपदरी मांडवी पुलाच्या नामफलकाचे पंतप्रधानांकडून अनावरण केले जाईल. सायंकाळी मिरामारच्या मेरियट हॉटेलमध्ये सुमारे दीडशे निमंत्रितांसमोर विचार मांडल्यानंतर तिथून पंतप्रधान दिल्लीला निघणार आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शासकीय यंत्रणेस तयारीच्या दृष्टीने सतर्क केले आहे. शिष्टाचार खाते, पोलीस खाते, वाहतूक खाते सक्रिय झाले आहे. पंतप्रधान गोवा दौऱ्यावेळी गोव्याच्या हिताच्या दृष्टीने कोणत्या घोषणा करतात, याकडे गोमंतकीयांचे लक्ष लागून आहे. (खास प्रतिनिधी)