शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

योग शिक्षणाबाबत राज्यात ‘उदासयोग’

By admin | Updated: June 10, 2015 00:56 IST

पणजी : एनसीईआरटीच्या नवीन पाठ्यपुस्तकात योग शिक्षणाचा सामावेश करण्याची प्रक्रिया सुरू असली, तरी शालेय अभ्यासक्रमात आधीपासूनच समाविष्ट करण्यात

पणजी : एनसीईआरटीच्या नवीन पाठ्यपुस्तकात योग शिक्षणाचा सामावेश करण्याची प्रक्रिया सुरू असली, तरी शालेय अभ्यासक्रमात आधीपासूनच समाविष्ट करण्यात आलेल्या योग विषयाची अंमलबजावणी गांभीर्याने करण्यात येत नाही. त्यामुळे नव्याने समाविष्ट केलेल्या योगा विषयाच्या अंमलबजावणीविषयी प्रश्नचिन्हच आहे.एनसीईआरटीच्या नवीन पाठ्यपुस्तकात योग या विषयाचा समावेश करण्याची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. ही पुस्तके लागू झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू होईल. २१ जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त सांघिक सूर्यनमस्कार घालण्याचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा खाते व आरोग्य खाते सक्रिय बनले आहे. त्यासाठी बैठका जोरात चालू आहेत. हा एका दिवसापुरताच विषय राहील की विद्यालयांत नियमितपणे त्याची अंमलबजावणी होईल, याबद्दल उत्सुकता आहे.योग शिक्षण हा शारीरिक शिक्षणाचा भाग आहे व विद्यालयातील शारीरिक शिक्षकावर ही जबाबदारी असते. इयत्ता पाचवी ते आठवी आणि नववी ते अकरावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात योग हा विषय आहे. प्रत्यक्षात याबाबतच्या अंमलबजावणीविषयी ना शिक्षण खात्याला माहिती आहे ना शालान्त मंडळाला. मंडळाचे अध्यक्ष जे. आर. रिबेलो यांना विचारले असता ते म्हणाले की, नववी ते अकरावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात योग शिक्षण आहे. काही माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांत त्याची अंमलबजावणी केली जाते; परंतु बऱ्याच ठिकाणी ती होत नाही.पाचवी ते आठवीपर्यंत असलेल्या योग अभ्यासक्रमाचीही तीच स्थिती आहे. गोवा शिक्षण खात्यालाही याविषयी सविस्तर माहिती नाही. अभ्यासक्रमात सामाविष्ट केला असला, तरी प्रत्यक्ष परीक्षेच्या दृष्टीने योग हा विषय महत्त्वाचा नसल्यामुळे त्याच्या अंमलबजावणीवर परिणाम झाला आहे. (प्रतिनिधी)