शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशासाठी धावपळ सुरूच

By admin | Updated: June 11, 2014 01:18 IST

पणजी : राज्यातील उच्च माध्यमिकमध्ये अकरावीच्या वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. चांगल्या निकालाची परंपरा असणाऱ्या उच्च माध्यमिक विद्यालयांत प्रवेशासाठी विद्यार्थी प्रयत्नरत आहेत.

पणजी : राज्यातील उच्च माध्यमिकमध्ये अकरावीच्या वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. चांगल्या निकालाची परंपरा असणाऱ्या उच्च माध्यमिक विद्यालयांत प्रवेशासाठी विद्यार्थी प्रयत्नरत आहेत. तसेच इच्छुक शाखेतील अपुऱ्या जागांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. यामुळे राजधानीतही काही ठरावीक विद्यालयांत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यालये सुरू झाली तरी पालक-विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. राज्यात शाखानिहाय ठरावीक उच्च माध्यमिक विद्यालये आहेत. तेथील शाखांच्या जागा मर्यादित असतात. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येत नाही. त्यासाठी ८0-८५ टक्क्यांच्या वर गुण मिळणे आवश्यक बनले आहे. काही उच्च माध्यमिक विद्यालयांत तर ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येतो. नाव उघड न करण्याच्या अटीवर एका प्राचार्याने सांगितले, हल्ली शिक्षणाबाबत पालक आणि मुलांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ज्या शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर सहजतेने पुढील शिक्षण घेऊन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील अशा शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा असतो. शहरातील काही प्रमुख खासगी हायर सेकंडरींचा निकाल शंभर टक्के लागला की त्याच विद्यालयात प्रवेश मिळविण्याची खटपट सुरूहोते. अनेक सरकारी हायर सेकंडरीत विविध शाखांत जागा शिल्लक असतात; पण विद्यार्थ्यांचा कल ठरावीक हायर सेकंडरीकडे असतो. विद्यार्थी व पालकांची ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. तसेच सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातून शिक्षण घेऊनही चांगल्या करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात याबाबत विश्वास निर्माण होण्याची आवश्यकता आहे. तेव्हाच प्रवेशादरम्यान होणारा गोंधळ आणि विद्यार्थ्यांवरील मानसिक तणाव कमी होऊ शकतो. (प्रतिनिधी)