लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : मुरगाव उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत हेडलैंड-सडा परिसरात छत्रपती शिवाजी महारांज्याच्या पुतळ्यापासून ५० मीटरच्या त्रिज्येत (रेडीयस) प्रतिबंधात्मक (जमावबंदी) आदेश लागू केले आहेत. हा आदेश पुढील ३० दिवस लागू असणार आहे.
हेडलैंड-सडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुरगाव पोर्ट अथोरेटी (एमपीए) च्या मालकीच्या जमिनीवरील हा पुतळा हटवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत.
मुरगाव उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने १६ एप्रिलला जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे की, 'न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी मुरगाव पोर्ट प्राधिकरणला करता यावी' यासाठी हे आदेश लागू केले आहेत.
१३ एप्रिलला झालेल्या कायदा आणि सुव्यवस्था आढावा बैठकीनंतर आणि पोलिस गुप्तचर विभागाच्या माहितीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्या परिसरात केवळ अधिकृत १ शासकीय अधिकारी, मुरगाव पोर्ट प्राधिकरणचे कर्मचारी आणि नियुक्त पोलिसांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
पोलिस दलाला पुरेसा बंदोबस्त ठेवण्याचे, तपासणी नाके उभारण्याचे, संपूर्ण कारवाईचे व्हिडिओग्राफी व रेकॉर्डिंग करण्याचे तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध अटकसह प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रतिबंधात्मक आदेश लागू
काही व्यक्तींच्या नेतृत्वाखाली एक ते दीड हजार लोक एकत्र येऊन प्रस्तावित कारवाईला विरोध करू शकतात, अशी शक्यता बैठकीत वर्तवण्यात आल्याने प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. जारी केलेल्या आदेशात प्रतिबंधित क्षेत्रात मोर्चे, धरणे, निदर्शने आणि घोषणाबाजीसह सर्व प्रकारच्या सार्वजनिक जमावावर बंदी घातली आहे. तसेच तणाव निर्माण करणारी किंवा भडकावू भाषणे व कृतींनाही मनाई केली आहे.
Web Summary : Curfew imposed within 50 meters of Shivaji statue in Headland-Sada due to law and order concerns. The statue removal was ordered by High Court. The order restricts public gatherings, protests, and inflammatory speeches for 30 days to facilitate court order execution.
Web Summary : हेडलैंड-सडा में शिवाजी प्रतिमा के 50 मीटर के दायरे में निषेधाज्ञा लागू। कानून-व्यवस्था के मद्देनजर उच्च न्यायालय के आदेश पर प्रतिमा हटाने के लिए यह कदम उठाया गया है। 30 दिनों तक सार्वजनिक सभाओं और भड़काऊ भाषणों पर रोक।