पर्यटकांची संख्या वाढणार

By Admin | Updated: June 4, 2014 01:36 IST2014-06-04T01:29:41+5:302014-06-04T01:36:51+5:30

पणजी : येत्या पर्यटन मोसमावेळी राज्यात १८ टक्के ज्यादा पर्यटक यावेत, असे लक्ष्य सरकारने समोर ठेवले आहे.

The number of tourists will increase | पर्यटकांची संख्या वाढणार

पर्यटकांची संख्या वाढणार

पणजी : येत्या पर्यटन मोसमावेळी राज्यात १८ टक्के ज्यादा पर्यटक यावेत, असे लक्ष्य सरकारने समोर ठेवले आहे. आम्ही या वेळी सेंट झेवियरच्या शवप्रदर्शनासाठीही युरोपमधून सुमारे ५० हजार पर्यटक गोव्यात यावेत म्हणून युरोपमध्ये विशेष प्रचार मोहीम राबवणार आहोत, असे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले. या वेळी आम्ही टर्की, उजबेकीस्तान अशा अनेक ठिकाणी गोव्याच्या पर्यटनाची जाहिरात केली होती. यापूर्वी गोव्याच्या पर्यटनासाठी आम्हाला २६८ कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद मिळाली होती. आम्ही खर्चही जास्त करतो व त्या तुलनेत महसूलही जास्त आणतो. आगामी काळात पर्यटकांसाठी अधिक साधनसुविधा उपलब्ध केल्या जातील. सेंट झेवियरचा येत्या नोव्हेंबरमध्ये जुने गोवे येथे शवप्रदर्शन सोहळा होणार आहे. स्पेनसह पूर्ण युरोपमध्ये आम्ही गोव्याच्या पर्यटनाविषयी जास्त जागृती करू. तिथे आम्ही रोड शोचेही आयोजन करू, असे मंत्री परुळेकर यांनी सांगितले. या विशेष प्रचारावर सुमारे चार कोटी रुपये खर्च केले जातील. त्यापैकी थोडा निधी केंद्रीय पर्यटन मंत्रालय देईल, असे मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले असल्याचे परुळेकर म्हणाले. यापुढे १८ टक्के पर्यटक वाढीचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे, असे परुळेकर म्हणाले. (खास प्रतिनिधी)

Web Title: The number of tourists will increase