शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गोंयात कोळसो नाका आंदोलन, मडगाव-फातोर्डात उत्स्फूर्त पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 20:22 IST

केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मडगाव व फातोर्डा येथे काढलेल्या रॅलीला लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.

मडगाव - गोव्यात सुरू झालेल्या कोळशा विरोधातील आंदोलनाला सासष्टीत चांगला प्रतिसाद मिळत असून सोमवारी केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मडगाव व फातोर्डा येथे काढलेल्या रॅलीला लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.

या आंदोलनाला गोवा फॉरवर्डनेही पाठिंबा दिला असून सोमवारी या रॅलीत आमदार विजय सरदेसाई यांनीही भाग घेतला. गोव्याच्या पर्यावरणाला घातक असलेल्या सर्व प्रकल्पना आपल्या पक्षाचा विरोध असेल असे त्यांनी सांगितले. त्यापूर्वी दुपारी हे आंदोलन सुरू केलेल्या 'गोयांत कोळसो नाका' या संघटनेच्या पदधिकाऱ्यानी  विजय सरदेसाई यांची भेट घेऊन सागरमाला प्रकल्प गोव्यासाठी कसा घातक हे सांगणारे निवेदन दिले.

ही रॅली फातोर्ड येथील रोजरी चर्च जवळून सुरू करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला वळसा घालून बोर्डा  मार्गे आल्यानंतर मडगाव येथून आके, कोकण रेल्वे परिसराला वळसा घालून मडगाव शहरात तिची समाप्ती करण्यात आली. कोळसा वाहतूकीला गोवा राज्यातून  निषेध करण्यासाठी ही चळवळ या संघटनेकडून उभारण्यात आली आहे. या बरोबरच या संघटनेने दुहेरी रेल्वे मार्गालाही विरोध केला आहे. हे आंदोलन तीव्र करण्यासाठी दोन ऑक्टोबर पासून प्रत्येक गावात जागृती करण्याकरिता रॅलीचे आयोजन  केले आहे.

याची सुरुवात गिर्दोली चांदर पासून  त्यांनी केली होती. या नंतर गोव्यातील प्रत्येक गावात ही रॅली जाणार असून या दरम्यान या प्रकल्पा पासून गोव्यातील वन संपदा नष्ट होईल तसेच पर्यावरण हानी होणार असल्याचे लोकांना सांगण्यात येणार असल्याचे या संघटनेचे संयोजक आंतोनियो डिसिल्वा यांनी सांगितले.

पुढे ते बोलताना म्हणाले की ही कुठलीही राजकीय चळवळ नाही. आम्ही या प्रकल्पाचा पूर्ण अभ्यास केला आहे. या प्रकल्पामुळे गोव्यातील जनतेला कुठलाही फायदा नाही. या प्रकल्पामुळे कोळसा रेल्वे मार्गावरून कर्नाटक येथे जाणार आहे. या रेल्वेच्या प्रकल्पा बद्दल केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी गोव्यातील जनतेला अंधारात ठेवले आहे.चांदर येथील फेलिक्स फुर्तादो यांनी सांगितले की या रेल्वे वाहतुकीत हरित गोव्याचे  अस्तित्व धोक्यात येणार आहे. या रेल्वेतून दर दिवशी कोळसा वाहतूक होणार आहे. या दरम्यान उडणारे कण सभोवतीच्या परिसरात पसरणार आहे. याचा परिणाम पर्यावरणावर होणार आहे असल्याचे शेवटी त्याने सांगितले.

 

टॅग्स :goaगोवा