शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन हंगामाच्या सुरुवातीसच नायजेरियन ड्रग्स पेडलर्स सक्रीय; 12 लाखांचा कोकेन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 16:44 IST

गिरी-बार्देश येथे केलेल्या कारवाईत आतार्पयत 17 नायजेरियनांना अटक

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: गोव्यात नव्याने पर्यटन हंगामाला सुरुवात झालेली असतानाच  अंमली पदार्थाच्या व्यवहारालाही जोर आला आहे. या व्यवसायातील नायजेरियन ड्रग्स पेडलर्स सध्या सक्रीय झाले असून मागच्या दहा दिवसांतच अशा दोन पेडलर्सना अटक करण्यात आली. आतार्पयत या दोन घटनांत एकूण 14 लाखांचा कोकेन पोलिसांनी जप्त केला. उत्तर गोव्यात हा व्यवहार मोठय़ा प्रमाणावर चालू आहे.

गुरुवारी रात्री अंमली पदार्थ विरोधी पथकाने गिरी-म्हापसा येथील चर्चजवळ इजीफोर इमान्युएल इडोको या 32 वर्षीय नायजेरियनला अटक करुन त्याच्याकडून 121 ग्रॅम कोकेन जप्त केला. या विभागाचे उपअधीक्षक महेश गावकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या मालाची किंमत 12 लाख एवढी असून ड्रग्स विक्रीसाठीच हा संशयित चर्चजवळ आला असता त्याला अटक करण्यात आली.

सदर संशयित शिवोली येथे रहाणारा असून यापूर्वी दोनवेळा त्याला अशाच प्रकारच्या अंमली पदार्थाच्या व्यवहारात अटक झाली होती अशीही माहिती प्राप्त झाली आहे. त्यापूर्वी 3 ऑक्टोबर रोजी कळंगूट पोलिसांनी केलेल्या कारवाईत मायकल निबुजे या 37 वर्षीय नायङोरियन संशयिताला अटक करुन त्याच्याकडून 37 ग्रॅम कोकेन जप्त केला होता. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 2 लाखाच्या आसपास आहे. 1 ऑक्टोबरपासून गोव्यात पर्यटन हंगाम सुरु झाला असून 4 ऑक्टोबरपासून विदेशी पर्यटक गोव्यात यायला लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हे ड्रग्स पेडलर्स पुन्हा सक्रीय झाले आहेत.जानेवारी ते आतार्पयत अंमलीपदार्थ व्यवहारात सामील असलेल्या एकूण 30 विदेशी संशयितांना अटक केली असून यात सर्वात जास्त प्रमाण नायङोरियनांचे आहे. आतापर्यत गोवा पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत एकूण 17 नायङोरियांनाना अटक केली असून त्या पाठोपाठ रशियन संशयितांचा क्रमांक लागतो. त्यांची संख्या दहा आहे त्याशिवाय केनिया, इटली व नेपाळ या देशातील प्रत्येकी एका संशयिताला अटक केलेली आहे.

मागच्या मे महिन्यात ज्यावेळी गोव्यातील पर्यटन हंगाम संपायला येतो त्यावेळीही गोवा पोलिसांनी अशीच एक मोठी कारवाई करत चुकुवाडू इजेच्युकवू या नायङोरियनाला शिवोली येथे अटक करत तब्बल 55 लाखांचा अंमलीपदार्थ जप्त केला होता. त्या नंतर 27 जुलैला च्युकुवाडी ओफारमाला या 43 वर्षीय नायङोरियनाला पणजीत अटक करुन त्याच्याकडून 2.70 लाखांचा कोकेन जप्त केला होता. 13 ऑगस्ट रोजी हरमल येथे केलेल्या कारवाईत सहा नायङोरियांना अटक करुन 4.40 लाखांचा माल जप्त केला होता. सप्टेंबर महिन्यात शिवोली व कळंगूट येथे दोन वेगवेगळ्या कारवाईत तीन नायङोरिनांना अटक करीत त्यांच्याकडून तब्बल 12 लाखांचा कोकेन जप्त केला होता.

टॅग्स :PoliceपोलिसDrugsअमली पदार्थ