शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

खाण आॅडिटचा बार फुसकाच!

By admin | Updated: February 25, 2015 03:00 IST

पणजी : राज्यातील यापूर्वीच्या खनिज घोटाळ्यांबाबत आम्ही सखोल चौकशी करू व गुन्हेगारांविरुद्ध कारवाईही करू

पणजी : राज्यातील यापूर्वीच्या खनिज घोटाळ्यांबाबत आम्ही सखोल चौकशी करू व गुन्हेगारांविरुद्ध कारवाईही करू, अशा वल्गना गेल्या तीन वर्षांत सरकारने अनेकदा केल्या, तरी प्रत्यक्षात खनिज व्यवहारांचे आॅडिटदेखील अजून पूर्ण झालेले नाही, हे खाण सचिवांनी मंगळवारी घेतलेल्या बैठकीवेळी निष्पन्न झाले. लिजधारकांनी शासकीय यंत्रणेशी असहकार पुकारला असल्याचे स्पष्ट झाले आहे. लिजधारकांकडून सहकार्य मिळत नाही व अन्य काही कारणे चार्टर्ड अकाउंटंट्सनी खाण सचिवांना दिली आहेत. मात्र, खाण क्षेत्रातील यापूर्वीच्या बेकायदा गोष्टींचा छडा लावण्यासाठी अगोदर खाण व्यवहारांचे आॅडिट होणे गरजेचे आहे, अशी भूमिका खाण सचिवांनी घेतली आहे. सर्वंकष असे आॅडिट करा व सविस्तर अहवाल शक्य तेवढ्या लवकर सादर करा, अशी सूचना खाण सचिवांनी चार्टड अकाउंटंट्सच्या पथकास केली आहे. दरम्यान, खाण सचिवांनी आॅडिटरांची आताच बैठक घेण्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही. आॅडिटरांची नियुक्ती मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना करण्यात आली होती. दोन वर्षे झाली, तरी आॅडिट अहवाल तयार होत नसल्याने बेकायदा खाणविरोधी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र काकोडकर यांनीही आश्चर्य व्यक्त केले. काकोडकर ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, खाण सचिवांनी दर महिन्यास आॅडिटसंबंधी बैठक घेऊन संबंधितांना सूचना करायला हव्या होत्या. आता अचानक त्यांनी बैठक घेतली. सर्वोच्च न्यायालयात यापुढे गोवा फाउंडेशनची याचिका सुनावणीस येणार असल्याने सरकारने आता बैठक घेतली असावी. लिजधारकांना दोष देऊन सरकार स्वत: सुरक्षित राहू पाहत आहे. घोटाळ्यांचा छडा लावण्याची सरकारला इच्छाशक्ती नाही. (खास प्रतिनिधी)