शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

मिकींच्या नशिबी पुन्हा कारावास?

By admin | Updated: July 18, 2014 02:05 IST

मडगाव : वीज अभियंता कपिल नाटेकर मारहाणप्रकरणी दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने नुवेचे आमदार मिकी पाशेको यांना गुन्हेगार सुधारणा कायद्यान्वये दिलेल्या

मडगाव : वीज अभियंता कपिल नाटेकर मारहाणप्रकरणी दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने नुवेचे आमदार मिकी पाशेको यांना गुन्हेगार सुधारणा कायद्यान्वये दिलेल्या शिक्षेची माफी मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर. जोशी यांनी कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द करताना पाशेको यांना सुनावलेल्या सहा महिन्यांच्या कैदेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे. विधानसभा अथिवेशनाच्या तोंडावरच आलेल्या या आदेशामुळे पाशेको आणि त्यांचे समर्थन लाभलेले पर्रीकर सरकार समोर एक नवीच समस्या उभी राहिली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार नरेंद्र सावईकर यांना साहाय्य केल्यामुळे मिकी पाशेको यांना भाजप सरकारात मंत्रिपद मिळणार, अशी हवा होती. मंत्रिपद मिळाले नाही, तरीही एखादे चांगले महामंडळ त्यांच्या पदरात पडेल, असेही बोलले जात होते. आता मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना या मारहाण प्रकरणात दोषी ठरविल्याने मंत्रिपदाची बक्षिसी मिळणार की नाही, याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निवाड्याने पाशेको राजकीयदृष्ट्या पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. गुरुवारी न्या. जोशी यांनी हा आदेश जारी केला. पाशेको यांनी दोन आठवड्याच्या आत मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयासमोर शरण यावे, असे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता पाशेकोसमोर एक तर तुरुंगात जाणे किंवा सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन उच्च न्यायालयाच्या या आदेशाला स्थगिती मागणे असे दोन पर्याय आहेत. निवाड्याची प्रत आल्यावर तिचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया पाशेको यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. (प्रतिनिधी)