शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

कला-साहित्य महोत्सवात व्यक्त झालेला सूर

By admin | Updated: December 8, 2014 02:00 IST

चुकीची धोरणे लादू नयेत यासाठी लोकशाही हे अस्त्र

पणजी : राजकारण्यांकडून चुकीची धोरणे लादली जाऊ नयेत यासाठी लोकशाही प्रभावी अस्त्र आहे. धोरणाच्या बाबतीत राजकारणी कुठे चुकले तर मतदार माफ करीत नाहीत, हे स्पष्ट आहे. सध्या आहे त्याच व्यवस्थेत राहून राजकारणाच्या माध्यमातून चांगली धोरणे कशी आणता येतील, हे पाहिले तर उत्तम; कारण कायदे, नियम हे मोडण्यासाठीच असतात आणि या बाबतीत नवे कायदे केले तरी काहीही निष्पन्न होणार नाही, असा सूर कला व साहित्य महोत्सवात रविवारी व्यक्त झाला. ‘राजकारण चांगले धोरण ठरवू शकते काय?’ या विषयावरील परिसंवादात राजकीय अभ्यासक एम. आर. महादेवन, नारायण रामचंद्रन, विनय सहस्रबुद्धे, मंजित कृपलानी व नितीन पै यांनी भाग घेतला. नारायण रामचंद्रन म्हणाले की, समाजाने नियोजनबद्धरीत्या काम केले, तर त्याचा राजकारण्यांकडून चांगली धोरणे आखण्यात बराच फायदा होईल. महादेवन म्हणाले की, इंदिराजींनी आणीबाणी लागू केल्यानंतर काँग्रेसचे काय झाले, हे लोकांनी अनुभवले आहे. त्यामुळे राजकारणी चुकले तर जनता माफ करीत नाही, हे दिसून आले. लॅम्म फेलोशिप या उपक्रमाची माहिती देताना त्यांनी सांगितले की, खासदारांच्या स्वीय साहाय्यकाला कोणते ज्ञान असावे, याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमातून ९८ पैकी २५ जण आज राजकारणात आले आहेत. राजकीय पक्षांवर अंकुश ठेवण्यासाठी कायदा हवा, असे मत विनय सहस्रबुद्धे यांनी मांडले. ते म्हणाले की, आजकाल राजकीय पक्ष उमेदवार ठरवितानासुद्धा कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत. सुदृढ लोकशाहीसाठी बहुपक्षीय पद्धत फार उपयुक्त आहे. मंजित कृपलानी यांनी मते मिळविण्यासाठी निवडणुकीच्या काळात मतदारांना आमिषे दाखविण्याचे जे प्रकार घडतात, त्याबद्दल सांगितले. अलीकडेच दक्षिण मुंबईत उमेदवाराच्या प्रचारार्थ त्या मैदानात उतरल्या होत्या, त्या वेळचे थक्क करणारे अनुभव त्यांनी कथन केले. (प्रतिनिधी)