शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी कोविड चाचणी सक्तीची करा; महिला काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 17:13 IST

राज्यात कोविडचा फैलाव वाढल्याने सरकारने पर्यटकांना आरटीपीसीआर कोविड चांचणी सक्तीची करावी, अशी महिला काँग्रेसची मागणी आहे.

पणजी : गोव्यात येणार्‍या पर्यटकांसाठी कोविड चांचणी सक्तीची करावी, अशी मागणी करणारे निवेदन महिला काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना सादर केले आहे.

महिला प्रदेशाध्यक्षा बीना नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश महिला सचिव प्रिया राठोड, मुक्तामाला फोंडवेकर, रोशन देसाई, पार्वती नागवेंकर, रेखा परब, संजना कौलगे व प्रतिभा बोरकर ढगे यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

राज्यात कोविडचा फैलाव वाढल्याने सरकारने पर्यटकांना आरटीपीसीआर कोविड चांचणी सक्तीची करावी, अशी महिला काँग्रेसची मागणी आहे.

त्या म्हणाल्या की, रस्ता मार्गे तसेच हवाई, रेल व समुद्रमार्गे गोव्यात येणार्‍या पर्यटकांना राज्यात प्रवेश करताना कोविड निगेटिव्ह दाखला सक्तीचा असायला हवा.

शेजारी महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये कोविड झपाट्याने वाढत आहे. गोव्याला भेट देणारे पर्यटक महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमधून मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे पर्यटकांसाठी कोविड चाचणी सक्तीची आहे, असे महिला काँग्रेसचे म्हणणे आहे.

महाकुंभमेळ्यास उपस्थिती लावलेल्यांना सक्तीचे क्वारंटाइन करावेहरिद्वार येथे महाकुंभमेळ्यात १२०० भाविक पॉझिटिव्ह आढळून आले. या कुंभमेळ्यात उपस्थिती लावून जर कोणी गोव्यात परतला असेल तर त्या व्यक्तीला पंधरा दिवस तरी सक्तीचे क्वारंटाइन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्याPramod Sawantप्रमोद सावंतKumbh Melaकुंभ मेळा