लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : स्थानिक रोजगाराला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी वेर्णा औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांसोबत बैठक घेतली. मनुष्यबळ विकास महामंडळाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे हा या बैठकीचा उद्देश होता.
वेर्णा उद्योग संघटनेचे अध्यक्ष कल्पक अरवारे, उपाध्यक्ष प्रमोद सुलाखे, गोवा राज्य उद्योग संघटनेचे अध्यक्ष प्रदीप डिकॉस्टा याप्रसंगी उपस्थित होते. मनुष्यबळ विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गुरुदास देसाई, कामगार व रोजगार आयुक्त राजेश आजगांवकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाग्रांनीही उपस्थिती लावली होती.
मुख्यमंत्र्यांनी महामंडळाची भूमिका अधिक प्रभावी करण्यावर भर देताना, ही संस्था उद्योगांसाठी 'स्टाफिंग पार्टनर' म्हणून कार्य करू शकते, असे स्पष्ट केले.
स्थानिक गोमंतकीय युवकांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना थेट उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
२३ रोजी रोजगार मेळा
येत्या २३ एप्रिल रोजी मनुष्यबळ विकास महामंडळ व वेर्णा उद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत जीआयडीसी हॉल, वेर्णा येथे रोजगार मेळा आयोजित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीनंतर दिली. या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून स्थानिक युवकांना विविध उद्योगांमध्ये रोजगाराच्या रोजग संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश असून, उद्योगांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
Web Summary : Chief Minister Pramod Sawant met Verna industrialists to boost local employment through skill development. A job fair on April 23rd at GIDC Hall aims to connect local youth with industries, offering various employment opportunities. Industries participation is highly encouraged.
Web Summary : मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने कौशल विकास के माध्यम से स्थानीय रोजगार को बढ़ावा देने के लिए वेर्णा के उद्योगपतियों से मुलाकात की। 23 अप्रैल को जीआईडीसी हॉल में एक नौकरी मेला स्थानीय युवाओं को उद्योगों से जोड़ने के लिए है, जिसमें रोजगार के विभिन्न अवसर मिलेंगे। उद्योगों की भागीदारी को प्रोत्साहित किया जाता है।