शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे ठप्प

By admin | Updated: October 8, 2014 01:28 IST

चिपळूण/मडगाव : चिपळूण ते वालोपे दरम्यानच्या रेल्वे मार्गावर खेर्डी पुलाजवळ मंगळवारी सकाळी ७.५५ वाजण्याच्या सुमारास रूळ तुटल्याने चाके

चिपळूण/मडगाव : चिपळूण ते वालोपे दरम्यानच्या रेल्वे मार्गावर खेर्डी पुलाजवळ मंगळवारी सकाळी ७.५५ वाजण्याच्या सुमारास रूळ तुटल्याने चाके निखळून मालगाडीचे ११ डबे घसरले. पाच डबे खाली शेतात कोसळले. या मालगाडीतून गव्हाची वाहतूक केली जात होती. या अपघातामुळे मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे मडगाव रेल्वे स्थानकावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी पहाटे कोकणकन्या व राज्यराणी एक्स्प्रेस रत्नागिरीकडे सुरक्षितपणे गेल्या. मात्र, पावणेआठ ते आठच्या दरम्यान चिपळूणनजीकच्या खेर्डी-माळेवाडी पुलाजवळ रूळ तुटला. त्यानंतर मुंबईहून बंगळुरूच्या दिशेने धावणारी मालगाडी येथे आली आणि तिचे ११ डबे घसरले. डब्याची चाके निखळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. या गाडीतून गहू नेला जात होता. सकाळच्या वेळी अचानक रेल्वेचे डबे घसरून खाली आल्याचे अनेकांनी पाहिले आणि बघ्यांची गर्दी झाली. इंजिन काही डब्यांसह पुढे निघून गेले, तर रूळ तुटल्याने दोन डब्यांमधील जोड तुटला. त्यामुळे डबे खाली कोसळले. अपघातानंतर तातडीने पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, साहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, उपनिरीक्षक अविनाश मते, जमादार राजेंद्र देसाई, हवालदार डी. व्ही. विभुते यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केले. या अपघातामुळे रत्नागिरी-दादर पॅसेंजर कामथे रेल्वे स्थानकात उभी करण्यात आली होती, तर मंगला एक्स्प्रेस सावर्डे (रत्नागिरी) रेल्वे स्थानकात उभी होती. या दोन्ही गाड्या परत पाठविण्यात आल्या. या मार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या. काही गाड्या पुणेमार्गे वळविण्यात आल्या आहेत. खेर्डी येथील रेल्वे पुलाचे ग्रील तुटून पडले असून ट्रॅकखालील खडी खाली कोसळली. रुळांखालचे सिमेंटचे पोल चिरडून गेले, तर लोखंडी रूळ वाकडेतिकडे झाले. काही डब्यांची चाके निखळली. कोकण रेल्वेचे अधिकारी व इंजिनिअर तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. डबे बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, रुळांची स्थिती पाहता उद्या, बुधवारी सायंकाळपर्यंत रेल्वे वाहतूक सुरळीत होईल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)