शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

माध्यान्ह आहारातून काणकोणात बाधा

By admin | Updated: June 15, 2014 01:18 IST

खोतीगाव/कुंकळ्ळी : खोला पंचायतीतील गवळखोल सरकारी शाळेच्या माध्यान्ह आहारात पाल पडून विषबाधा झाल्याने सहा मुलांना बाळ्ळी येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

खोतीगाव/कुंकळ्ळी : खोला पंचायतीतील गवळखोल सरकारी शाळेच्या माध्यान्ह आहारात पाल पडून विषबाधा झाल्याने सहा मुलांना बाळ्ळी येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शनिवारी १४ जून रोजी मुलांना माध्यान्ह आहारात पावभाजी देण्यात आली. या भाजीत पाल पडल्याने भाजी विषारी झाली होती. मात्र, हे कुणाच्याही लक्षात न आल्याने मुलांनी पावभाजी खाल्ली. त्यानंतर सुजित वैलेकर व रातिया वेळीप (इयत्ता सातवी) यांना उलट्या होण्यास सुरुवात झाली, तर विदित पागी (इयत्ता सातवी), साहील पागी (इयत्ता नववी), अक्षिदा गावकर (इयत्ता सातवी), मेधा झोरारकर (इयत्ता सातवी) यांनाही त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने बाळ्ळी येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मधल्या सुट्टीत देण्यात आलेली पावभाजी खायला सुरुवात केल्यानंतर एका मुलाला भाजीत पाल सापडल्यामुळे त्याने ही गोष्ट आपल्या मित्रांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर वरील सहाही मुलांनी उलट्या करायला सुरुवात केली. शाळेच्या मुख्याध्यापिकेने व इतर शिक्षकांनी वेळ न दवडता लगेच १०८ रुग्णवाहिका आणून बाधा झालेल्या मुलांना बाळ्ळी येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ. हरीश नागरली व इतर कर्मचाऱ्यांनी या मुलांवर तातडीने उपचार केले. सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून, त्यांना देखरेखीखाली एक दिवस आरोग्य केंद्रात ठेवण्यात येणार असल्याचे डॉ. नागरली यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेची खबर मिळताच केपेचे आमदार बाबू कवळेकर यांनी विषबाधा झालेल्या मुलांची भेट घेऊन विचारपूस केली. शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व भागशिक्षणाधिकारी शारदा फळदेसाई यांनीही आरोग्य केंद्रास भेट दिली. माध्यान्ह आहार करण्याचे कंत्राट एका स्थानिक महिला मंडळाकडे असून, या संदर्भात चौकशी करण्यात येणार असल्याचे भागशिक्षणाधिकारी फळदेसाई यांनी सांगितले. पाल मिळालेली भाजी व पावाचे नमुने तपासणीसाठी अन्न व औषध खात्याकडे पाठविण्यात येणार आहेत. याबाबत मुख्याध्यापिकेने पोलिसांत तक्रार नोंद केली असून, कुंकळ्ळी पोलीस पुढील चौकशी करीत आहेत. (वार्ताहर)