शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

महागाईने खिसा कापला!

By admin | Updated: July 1, 2014 01:40 IST

महागाईने खिसा कापला!

पणजी : लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘अच्छे दिन आनेवाले है...’ अशा भूलथापा देउन सत्ता मिळविल्यानंतर केंद्रातील सरकारला महागाईने महिन्याभरातच चीतपट केले आहे. जीवनावश्यक दरांच्या किमती सातत्याने वाढत असताना महागाईवर नियंत्रण आणण्यात केंद्र व राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. सोमवारी पेट्रोल व डिझेलच्या दरांत वाढ करून केंद्र सरकारने सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळले, तर राज्यात गोवा डेअरीने सर्व प्रकारच्या दुधाचे दर दोन रुपयांनी वाढविल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. नारळाचे दरही वाढले असून फलोत्पादन विकास महामंडळाला कांद्यावर दिल्या जाणाऱ्या अनुदानात सरकारने चाळीस टक्क्यांवरून पंचवीस टक्क्यांपर्यंत घट केली आहे. त्यामुळे कोथिंबिरीबरोबरच कांदाही स्वयंपाकघरातून हद्दपार होण्याची शक्यता आहे. कांद्याचा दर खुल्या बाजारात सध्या ४० रुपये प्रति किलो असा आहे. फलोत्पादन विकास महामंडळाच्या दालनांमध्ये कांदा ३२ रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. अगोदर कांद्यासाठी फलोत्पादन महामंडळास कांद्याच्या विक्रीवर सरकार चाळीस रुपयांचे अनुदान देत होते. त्यामुळे कांदा महामंडळाच्या दालनात स्वस्त वाटत होता. गेल्या फेब्रुवारीपासून सरकारने महामंडळाच्याच विनंतीवरून अनुदानाचे प्रमाण ४० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे महामंडळ आता कमी दराने कांदा विकू शकत नाही. नारळाचे दर बाजारपेठांमध्ये वीस ते पंचवीस रुपये नग असा आहे. जी कोथिंबिर अगोदर दहा रुपयांना मिळत होती, त्यासाठी आता चाळीस रुपये मोजावे लागत आहेत. (प्रतिनिधी)