शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांसमोर सरकारची धुलाई

By admin | Updated: June 19, 2015 01:39 IST

पणजी : या राज्यात स्वातंत्र्यसैनिकांना मान दिला जात नाही, मान देत नसाल तर आम्हाला बोलावलेच कशाला, असा खडा सवाल करून क्रांतिदिनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर

पणजी : या राज्यात स्वातंत्र्यसैनिकांना मान दिला जात नाही, मान देत नसाल तर आम्हाला बोलावलेच कशाला, असा खडा सवाल करून क्रांतिदिनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या उपस्थितीतच स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष श्याम सुंदर नागवेकर यांनी सरकारची गुरुवारी (दि.१८) धुलाई केली. क्रांतिदिनाचा कार्यक्रम हा धुलाईमुळे गाजला. आझाद मैदानावर आयोजित या कार्यक्रमात एका बाजूने पाऊस मंडपाच्या बाहेर धुलाई करीत होता तर दुसऱ्या बाजूने स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष नागवेकर सरकारची धुलाई करीत होते. यामुळे संपूर्ण मंडपात शांतता पसरली होती. क्रांतिदिनीच्या कार्यक्रम पत्रिकेवरही स्वातत्र्य सैनिकांचा उल्लेख केला नव्हता. या गोष्टीकडे निर्देश करून नागवेकर यांनी सरकारवर आसूड ओढले. १८ जून हा स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानार्थ कार्यक्रम आहे आणि सन्मान करता येत नसेल तर निदान बोलावून अपमान तरी करू नका. मंत्र्यांच्या गाड्यांना कार्यक्रमस्थळी येण्यास परवानगी असते; परंतु स्वातंत्र्यसैनिकांना दूर गाड्या ठेवून चालत यावे लागत आहे. पोर्तूगीज गेले; परंतु पोलिसांनी पोर्तुगिजांचा चसा चालविला असल्याचा आरोप त्यांनी केला. गोवा हा स्वातंत्र्यसैनिकांनी मूक्त केला आहे, त्यामुळे तुमच्या मुळे आम्ही आहोत हा समज मंत्र्यांनी मनातून काढून टाकावा आणि आमच्यामुळे तुम्ही आहात हे पक्के ध्यानात ठेवावे असे त्यांनी सांगितले. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन योजना सुरू केली नसती तर स्वातंत्र्यसैनिकांवर रस्त्यावर पडण्याची पाळी आली असती, असे ते म्हणाले. स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले होते. ते दिल्लीला जाऊन संरक्षणमंत्री बनल्यामुळे आता विद्यमान मुख्यमंत्र्यांनी आश्वासनपूर्ती करावी अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी त्यानंतर बोलताना स्वातंत्र्यसैनिकांचा राज्याला आदर असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या प्रलंबित मागण्याही पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर, पर्यावरणमंत्री अ‍ॅलिना सालढाणा, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस्क डिसोझा व आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर उपस्थित होते.