शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचा अर्थसंकल्प 6 रोजी मांडणार, ग्रामीण विकासावर भर : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 19:39 IST

राज्याचा 2020-2021 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प येत्या 6 फेब्रुवारी रोजी विधानसभेत मांडला जाणार आहे.

पणजी : राज्याचा 2020-2021 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प येत्या 6 फेब्रुवारी रोजी विधानसभेत मांडला जाणार आहे. अर्थसंकल्पाचा भर यावेळी ग्रामीण विकासावर असेल आणि पर्यटन क्षेत्रचीही काळजी घेतली जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.विधिमंडळ कामकाज समितीचीही (बीएसी) सोमवारी बैठक झाली. 3 फेब्रुवारीपासून पाच दिवसीय अधिवेशन सुरू होईल. 6 रोजी अर्थसंकल्प मांडावा असे बीएसी बैठकीत ठरले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्पासाठी समाजाच्या सर्व थरातील लोकांनी त्यांच्या सूचना कराव्यात. लोकांनी त्यांच्या कल्पना मांडाव्यात. अर्थसंकल्प तयार करण्यासाठी त्याचा लाभ होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. रोजगार निर्मितीवर अर्थसंकल्पाचा भर असेल काय असे पत्रकारांनी विचारले असता, रोजगार निर्मितीवर भर असू शकत नाही, ग्रामीण विकासावर अर्थसंकल्पाचा भर असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.सध्याही लोकांकडून ईमेलद्वारे व अन्य प्रकारे बजेटसाठी सूचना येत आहेत. अनेकांकडून प्रसार माध्यमांमध्येही मते मांडली जात आहेत. गोव्याच्या कृषी, आयटी व अन्य अनेक क्षेत्रंमध्ये बुद्धीमान तरूण आहेत. अनेकांकडे अनुभव आहे. त्यांनी त्यांचे अनुभव वेब पोर्टलवर नोंद करावेत, आम्ही सूचना विचारात घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पूर्वीच्या अर्थसंकल्पातील किती तरतुदींचे पालन केले गेले. किती आश्वासने पाळली गेली. किती योजना अंमलात आणल्या गेल्या याचा आढावा घेणो सुरू आहे. यावेळी विधानसभेत त्याविषयी कृती अहवाल मांडला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.वेब पोर्टल सुरू दरम्यान, अर्थसंकल्पाविषयी गोवाऑनलाईन डॉट जीओव्ही डॉट इन ह्या संकेतस्थळावर गोवा बजेट, असा विभाग आहे. तिथे लोक सूचना नोंदवू शकतील. मुख्यमंत्री सावंत यांनी या वेब पोर्टलचे उद्घाटन केले. एरव्ही एनजीओंकडून काही प्रकल्पांना आक्षेप घेतला जातो. त्यांच्याकडून न्यायालयात धाव घेतली जाते. गोव्याच्या हिताच्यादृष्टीने त्यांनीही वेब पोर्टलवर अर्थसंकल्पासाठी सूचना करावी. आमच्या राजकीय विरोधकांनीही सूचना कराव्यात, असे मुख्यमंत्री म्हणाले.