शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

भाजपासाठी धोक्याची घंटा; गोव्यातील बड्या नेत्यालाही खुणावतोय 'महाविकास आघाडी'चा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 17:15 IST

महाराष्ट्राच्या राजकारणात नवं समीकरण अस्तित्वात आल्यानंतर आता शिवसेनेनं गोव्यातही असा प्रयोग होऊ शकतो का, याची चाचपणी सुरू केली आहे.

पणजी- महाराष्ट्राच्या राजकारणात नवं समीकरण अस्तित्वात आल्यानंतर आता शिवसेनेनं गोव्यातही असा प्रयोग होऊ शकतो का, याची चाचपणी सुरू केली आहे. गोव्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असून, विजय सरदेसाईंनी संजय राऊतांची भेट घेतली आहे. त्यामुळे गोव्याचे उपमुख्यमंत्री आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई संपर्कात असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे संजय राऊतांच्या भेटीनंतर विजय सरदेसाईंनीही सूचक प्रतिक्रिया दिली आहे.फक्त घोषणा करून सरकार बदलत नसतं. ते सगळं अचानकच होतं. महाराष्ट्रात जे झालं तसा प्रयोग गोव्यातही केला पाहिजे. सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. आम्ही संजय राऊतांची भेट घेतलेली आहे. 'महा विकास आघाडी' तयार झालेली आहे. ती गोव्यापर्यंतही विस्तारायला हवी, असंही ते म्हणाले आहेत. गोव्यात विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षाचे तीन आमदार आहे. गोवा विधानसभेसाठी 2017मध्ये निवडणूक झाली होती. भाजपा, गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अपक्षांच्या मदतीनं भाजपानं सरकार स्थापन केलं होतं. गोवा विधानसभेच्या 40 जागांपैकी सध्या काँग्रेसकडे सर्वाधिक 14 जागा होत्या. तर भाजप आमदार फ्रान्सिस डिसूजा आणि मनोहर पर्रीकर यांच्या निधनाने भाजपाकडे आता 12 आमदारांचं बळ आहे. गोवा फॉरवर्ड पार्टी 3, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष 1 आणि अपक्ष असे 3 आमदार आहेत, तर 1 आमदार राष्ट्रवादीचा आहे. काँग्रेसच्या 12 आमदारांनी वेगळा गट करून भाजपाला साथ दिली. त्यामुळे भाजपाचं संख्याबळ 27 वर पोहोचलं. त्यामुळे आता गोव्यात कोणता भूकंप घडतो का हे लवकरच समजणार आहे. 

टॅग्स :goaगोवा