शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात अंमली पदार्थांतील नायजेरियन हात पुन्हा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 20:16 IST

गोव्यात बेकायदेशीररित्या वास्तव करुन रहाणाऱ्या विदेशी नागरिकांचा मुख्य उद्देश अंमली पदार्थाच्या व्यवसायाशी निगडित आहे

- सुशांत कुंकळयेकर मडगाव - गोव्यात बेकायदेशीररित्या वास्तव करुन रहाणाऱ्या विदेशी नागरिकांचा मुख्य उद्देश अंमली पदार्थाच्या व्यवसायाशी निगडित आहे हे पुन्हा एकदा कळंगूट पोलिसांनी उत्तर गोव्यातील कांदोळी या जगप्रसिद्ध किनारपट्टी भागात केलेल्या कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. २0११ पासून गोव्यात बेकायदेशीररित्या वास्तव करुन असलेल्या इफीयानी पाश्कोल ओबी या नायजेरियनाला अटक केली असता त्याच्याकडे ३ कोटींचा अंमलीपदार्थ सापडला. यंदाचा हा सर्वांत मोठा साठा आहे. या घटनेमुळे गोव्यातील पर्यटन व्यवसायातील काळीबाजू पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.मागच्या दहा महिन्यात अंमली पदार्थ व्यवसायात असलेल्या तब्बल ३५ विदेशी नागरिकांना अटक केली असून त्यात सर्वांधिक नायजेरियनांची संख्या सर्वांधिक असून त्यानंतर रशियनांचा नंबर लागतो. आतापर्यंत विदेशी नागरिकांविरोधात झालेल्या कारवाईत तब्बल २१ नायजेरियांना अटक करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ ११ रशियन आरोपी आहेत. केनिया, इटाली व नेपाळ या देशातील प्रत्येकी एक नागरीकांची या व्यवहारात अटक झाली आहे.कळंगूट पोलिसांनी मंगळवारी केलेल्या कारवाईत अटक केलेल्या ओबी उर्फ आलेक्स हा आरोपी २0११ पासून गोव्यात वास्तव करत असून २0११ साली त्याला अवैधरित्या भारतात वास्तव करुन रहात असल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्यानंतर २0१२ मध्ये त्याला कळंगूट पोलिसांनी कोकेन प्रकरणात अटक केली होती. गोव्यात बेकायदेशीररित्या वास्तव करुन अंमली पदार्थांचा धंदा चालविणे ही नायजेरियनांची मोडस आॅपरेंडी असून ३0 जानेवारी रोजी कोळंब—काणकोण येथे अशाच प्रकारे जोजम ओबुमा या केनियाच्या संशयिताला अटक करुन त्याच्याकडून २.२५ लाखांचा कोकेन जप्त केला होता. त्यावेळीही हा आरोपी २0११ पासून गोव्यात बेकायदेशीर वास्तव करुन रहात असल्याचे उघडकीस आले होते. यंदा आॅक्टोबर महिन्यातच गिरी—म्हापसा येथे १0 रोजी इजिफोर इमान्यूएल इडोको या ३७ वर्षीय नायजेरियनाला अटक केली असता त्याच्याकडे १२ लाखांचा कोकेन सापडला होता.त्यापूर्वी १0 सप्टेंबरला शिवोली येथे इफेइयानी ओबिन्ना ४१ व चिडीएब्रो ओनुचुकिओ या दोन नायजेरियांना अटक केली असता त्यांच्याकडे ७.५0 लाखांचे अंमलीपदार्थ सापडले होते. १३ आॅगस्ट रोजी हरमल येथे केलेल्या कारवाईत अशाचप्रकारे ६ नायजेरियनांना अटक केली होती. त्यावेळी त्यांच्याकडे ४.५0 लाखांचे अंमलीपदार्थ सापडले होते. मंगळवारी केलेली कारवाई गोव्यातील सर्वांत मोठी कारवाई असली तरी या पूर्वी १९ मे रोजी शिवोली येथे पोलिसांनी धाड घालून चुकुउडी इजेचुकऊ याच्याकडे ५४.५२ लाखांचे अंमलीपदार्थ सापडले होते.गोवा पोलिसांनी यंदा केलेल्या कारवाईत रशियनांचाही समावेश असून २४ जानेवारी रोजी शिवोली येथे मार्टिन आकिनोव्ह याला अटक केली असता त्याच्याकडे ४.९0 लाखांचे अंमलीपदार्थ सापडले होते. २९ जानेवारी रोजी मोरजी येथे अ‍ॅलेक्झांडर सेजिनोव्ह या ३0 वर्षीय रशियनाला अटक केली असता त्याच्याकडे दोन लाखांचा एमएमडीए हा अंमलीपदार्थ सापडला होता. २ एप्रिल रोजी आश्वे—पेडणे येथे मॅक्झीम कुसहानी या ३१ वर्षीय रशियनाला अटक केली असता त्याच्याकडे २.४0 लाखांचे तर १३ एप्रिल रोजी अंजुणा येथे अटक केलेला सेर्जिओ वास्तेव्ह या रशियनाकडे तब्बल ६.७0 लाखांचा कोकेन सापडला होता. एवढेच नव्हे तर ग्रिगोनी फोमेन्को (३२) व त्याची पत्नी व्हिक्टोरिया (२७) या दोघांनी कळंगूट येथे चक्क गांजाची शेती सुरु केली होती असेही उघडकीस आले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवाDrugsअमली पदार्थ