शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनाविषयी गोमंतकीयांना धास्ती, सरकार किंचित बेपर्वा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 13:48 IST

शिगमोत्सवाचे आयोजन बंद झालेले नाही. सरकारने लोकांना खबरदारी घेण्याचे सल्ले दिले आहेत, पण रेल्वे स्थानके, बस स्थानके व अन्यत्र कोरोनाविरोधी आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबत सरकार थोडे बेपर्वाच असल्याची गोमंतकीयांची भावना झालेली आहे.

पणजी : कोरोनाचा एकही रुग्ण अजून गोव्यात सापडलेला नाही पण दोघा संशयितांवर सरकारच्या गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत. कोरोनाचे रुग्ण शेजारील पुण्यापर्यंत पोहोचल्याने गोमंतकीयांमध्ये धास्ती वाढली आहे. मात्र शिगमोत्सवाचे आयोजन बंद झालेले नाही. सरकारने लोकांना खबरदारी घेण्याचे सल्ले दिले आहेत, पण रेल्वे स्थानके, बस स्थानके व अन्यत्र कोरोनाविरोधी आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबत सरकार थोडे बेपर्वाच असल्याची गोमंतकीयांची भावना झालेली आहे.गोव्यातील सर्व शहरांमध्ये व ग्रामीण भागात सध्या शिगमोत्सव सुरू आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा कुणी संशयित रुग्ण सापडलेला नाही. ग्रामीण भागात शिगमोत्सवात भाग घेण्यासाठी विदेशी पर्यटकही जास्त जात नाहीत पण शहरांमध्ये सरकारी पाठिंब्याने शिगमोत्सवाच्या ज्या मिरवणुका होतात, त्यात विदेशी पर्यटकही भाग घेत असतात. दूरवर प्रवास करून आलेले विदेशी पर्यटक शिगमोत्सवावेळी गोमंतकीयांमध्ये मिसळतात. पर्यटन खाते लाखो रुपये शिगमोत्सवाच्या मिरवणुकांवर खर्च करते. यंदा प्रमुख शहरातील शिगमोत्सव बंद करायला हवा होता, असा सूर समाजाच्या जागृत घटकांमध्ये उमटत आहे. लोकांनी मोठय़ा संख्येने एकत्रिकरण टाळावे असे सल्ले सरकारचे आरोग्य मंत्री विश्वजित राणो हे रोज गोमंतकीयांना देत आहेत पण सरकारच्या पर्यटन खात्याच्याच पाठिंब्याने शिगमोत्सवानिमित्त मोठे एकत्रिकरण होणार आहे व त्यात पर्यटकही भाग घेणार आहेत. काही शहरांत अगोदरच मिरवणुका सुरू झाल्या आहेत.गोव्यात सध्या जिल्हा पंचायत निवडणुकीची प्रक्रियाही सुरू आहे. राज्यभर प्रचाराचे फड रंग आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह सर्वच मंत्री त्यात सहभागी होत आहेत. भाजप, काँग्रेस, मगोपसह विविध पक्षांकडून छोटय़ा सभा घेतल्या जात आहेत. मतदान येत्या 22 रोजी होईल व त्यावेळी मतपत्रिकांचा वापर केला जाणार आहे. मतदान करण्यासाठी हजारो लोकांकडून स्टॅम्पचा वापर केला जाणार आहे. त्यावेळी सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली जात आहे. काँग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी नुकतीच सरकारवर टीका केली. रेल्वे स्थानके व बस स्थानकांवर कोरोनाविरोधी तपासणीची कोणतीच व्यवस्था सरकारने केली नसल्याचे डिमेलो म्हणाले. शाळा, महाविद्यालयांमध्ये हजारो विद्याथ्र्याचे एकत्रिकरण होत आहे पण आरोग्य खात्याने तिथे लक्षच दिलेले नाही, असे डिमेलो म्हणाले.दरम्यान, सरकारी कर्मचा:यांनी कार्यालयात मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा आणि गोमंतकीयांनी गोव्याबाहेरचा व विदेशातील प्रवास सध्या टाळावा, असा सल्ला आरोग्य खात्याने दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना