शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात किमान दहा हजार ग्राहकांना सौर ऊर्जेकडे वळविण्याचे उद्दिष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 20:10 IST

पर्यायी ऊर्जा स्रोत योजनेखाली येत्या वर्षअखेर गोव्यात किमान दहा हजार वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या बाजूने वळविण्याचे लक्ष्य गोवा सरकारने ठेवले असून त्यासाठी नगरनियोजन कायद्यात बदल करण्याची शिफारस पर्यावरणमंत्री निलेश काब्राल यांनी केली आहे.

मडगाव: पर्यायी ऊर्जा स्रोत योजनेखाली येत्या वर्षअखेर गोव्यात किमान दहा हजार वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या बाजूने वळविण्याचे लक्ष्य गोवा सरकारने ठेवले असून त्यासाठी नगरनियोजन कायद्यात बदल करण्याची शिफारस पर्यावरणमंत्री निलेश काब्राल यांनी केली आहे. यापुढे गोव्यात उभ्या रहाणा:या प्रकल्पांना सौर ऊर्जेची सक्ती करण्याची शिफारस त्यांनी केली आहे.

वीज आणि पर्यावरण ही दोन्ही खाती निलेश काब्राल हे सांभाळत असून गोव्यातील एकूण 6.7 लाख वीज ग्राहकांपैकी किमान दहा हजार ग्राहकांना तरी सौर ऊर्जेकडे वळविण्याचे उद्दिष्टय़ त्यांनी ठेवले आहे. गोवा सौर ऊर्जा धोरण डिसेंबर 2017 साली अधिसूचित केले असले तरी आतार्पयत केवळ 400 लोकांनीच हा सौर ऊर्जेचा पर्याय स्वीकारला आहे. मूळ धोरणातील काही अडचणी लक्षात घेऊन मागच्या फेब्रुवारी महिन्यात या धोरणात काही सुधारणा करण्यात आल्याची माहिती काब्राल यांनी दिली.

काब्राल म्हणाले, पर्यावरण जतनाच्या दृष्टीने सौर ऊर्जा हा सर्वात चांगला प्रस्ताव आहे. मात्र अजुनही गोव्यातील लोकांनी तो स्वीकारलेला नाही. भविष्याची गरज ओळखून गोव्यात उभारणा:या प्रत्येक प्रकल्पाला सौर ऊर्जा जोडणी घेण्याची सक्ती नगरनियोजन कायद्यात करण्याची आवश्यकता असून या खात्याचे मंत्री बाबू कवळेकर यांच्यासमोर तसा प्रस्ताव ठेवल्याचे त्यांनी सांगितले. गोव्याच्या सौर ऊर्जा धोरणाप्रमाणो, जोडणी घेणा:या ग्राहकाला सरकारकडून 50 टक्के अनुदान दिले जाते. त्याशिवाय ही यंत्रणा पुरविणा:या उत्पादकांनाही अनुदान मिळते. या 50 टक्क्यांपैकी 30 टक्के वाटा केंद्र सरकार उचलत असून जर नगरनियोजन कायद्यात बदल केला तर आणखी ग्राहक त्या पर्यायाकडे वळतील असे काब्राल म्हणाले.

टॅग्स :environmentपर्यावरणgoaगोवाelectricityवीज