गोव्यात नवे 348 कोविडग्रस्त आढळले, चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 09:06 PM2020-08-05T21:06:25+5:302020-08-05T21:06:45+5:30

राज्यात सध्या 2 हजार 72 सक्रिय कोविड रुग्ण आहेत. आतार्पयत एकूण 7 हजार 423 व्यक्तींना कोविडची बाधा झाली व त्यापैकी 5 हजार 287 रुग्ण कोविडमधून बरे झाले.

In Goa, 348 new cobwebs were found, killing four | गोव्यात नवे 348 कोविडग्रस्त आढळले, चौघांचा मृत्यू

गोव्यात नवे 348 कोविडग्रस्त आढळले, चौघांचा मृत्यू

Next

पणजी : राज्यात कोविडग्रस्तांची संख्या कमी होतच नाही, उलट रोज वाढत आहे. बुधवारी नवे 348 कोविड रुग्ण आढळले. 173 कोविडग्रस्त आजारातून बरे झाले. मात्र चौघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोविडने मेलेल्या व्यक्तींची एकूण संख्या बुधवारी 64 झाली.
एकाच दिवशी 348 एवढय़ा मोठय़ा संख्येने कोविड रुग्ण यापूर्वी कधीच आढळले नव्हते. खांडोळा- माशेल येथील 71 वर्षीय महिला कोविड इस्पितळात मरण पावली. प्रियोळ मतदारसंघातील हा पहिला मृत्यू ठरला आहे. फर्मागुडी फोंडा येथील 63 वर्षीय पुरुष रुग्णाचाही कोविड इस्पितळात मृत्यू झाला. कुडणो- साखळी येथील 65 वर्षीय इसमाचा कोविडने बळी घेतला. तोर्डा पर्वरी येथील 79 वर्षीय महिलेचाही कोविड इस्पितळात मृत्यू झाला. या दोघांना अन्य आजार असल्याने अगोदर गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले होते.

पणजीत 85 रुग्ण
राज्यात सध्या 2 हजार 72 सक्रिय कोविड रुग्ण आहेत. आतार्पयत एकूण 7 हजार 423 व्यक्तींना कोविडची बाधा झाली व त्यापैकी 5 हजार 287 रुग्ण कोविडमधून बरे झाले. पणजी रुग्णालयाच्या क्षेत्रत कोविडग्रस्तांची संख्या 85 झाली आहे. बुधवारी चार नवे रुग्ण आढळले. त्यापैकी दोघे मळा भागातील आहेत व त्यांचे वय अनुक्रमे 21 व 24 आहे. दत्त मंदिर चिंचोळे येथे एक कोविडग्रस्त आढळला. आल्तिनो झोपडपट्टी क्षेत्रतील 115 व्यक्तींचे नमूने घेतले गेले आहे. अजून अहवाल आलेला नाही. पेडणो रुग्णालयाच्या क्षेत्रत 36, वाळपई इस्पितळाच्या क्षेत्रत 67, चिंबल आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत 90, पर्वरीत 53, मडकई आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत 28 कोविडग्रस्त आहेत.मडगावच्या क्षेत्रत 136 तर वास्को इस्पितळाच्या क्षेत्रत 398 कोविडग्रस्त आहेत.

 

Web Title: In Goa, 348 new cobwebs were found, killing four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.