शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

‘लिज’चे भवितव्य आज ठरणार

By admin | Updated: October 13, 2014 02:17 IST

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी : नूतनीकरणास गोवा फाउंडेशनकडून स्थगितीची मागणी

पणजी : गेल्या आॅगस्टमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या निवाड्याचे भवितव्य आज सोमवारी (दि.१३) सर्वोच्च न्यायालयात ठरण्याची दाट शक्यता आहे. त्या निवाड्याला गोवा फाउंडेशन या पर्यावरणवादी संस्थेने आव्हान दिले असून, त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. लिज नूतनीकरण प्रक्रियेस गोवा फाउंडेशनने स्थगिती मागितली आहे. स्थगिती मिळते की नाही याकडे सरकारचे, पर्यावरणवाद्यांचे व खाण व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. क्लॉड अल्वारिस यांच्या गोवा फाउंडेशन संस्थेने सर्व २८ खाण कंपन्यांना प्रतिवादी केले आहे. २८ खाणींनी लिजांवर दावे करून स्टॅम्प ड्युटी सरकारच्या तिजोरीत जमा केली आहे. लिज नूतनीकरणास न्यायालयाने जर स्थगिती दिली तर मात्र आपण अगोदरच स्टॅम्प ड्युटी भरून फसलो, अशी खाण व्यावसायिकांची भावना बनेल. गोवा फाउंडेशनने यापूर्वी एकाच खाण कंपनीस प्रतिवादी केले होते; कारण त्याच कंपनीने जास्त स्टॅम्प ड्युटी भरली असून, एकच कंपनी विविध लिजेस यापूर्वी चालवत होती. फाउंडेशनची सुधारित आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी, खाण खात्याचे संचालक प्रसन्ना आचार्य यांनी सुनावणीवेळी बाजू मांडण्यासाठी पूर्वतयारी केली आहे. राज्यातील खाण व्यवसाय बंद आहे. त्यामुळे लिज नूतनीकरणास न्यायालयाने स्थगिती दिली नाही तरी काहीच बिघडणार नाही, असे खाणींच्या विषयाचे अभ्यासक राजेंद्र काकोडकर यांना वाटते. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच सर्व लिजेस रद्दबातल ठरविलेली असल्याने व सध्या खाण व्यवसायही बंद असल्याने लिजांचे नूतनीकरण करून काहीच प्राप्त होणार नाही. खाणी सुरू होऊ शकणार नाहीत. खाण कंपन्यांना त्यामुळे आर्थिक नुकसानी सोसावी लागेल, असे काकोडकर यांचे म्हणणे आहे. (खास प्रतिनिधी)