शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचे माजी उपसभापती सायमन डिसोझा यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 20:21 IST

निधनावेळी सायमन डिसोझा ८२ वर्षांचे होते, गुरुवारी (दि.२४) वास्कोच्या सेंट अँड्रू चर्चच्या दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत.

वास्को: गोवा विधानसभेचे माजी उपसभापती तथा काँग्रेस नेते सायमन डिसोझा यांचे बुधवारी (२३) पहाटे गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचार घेत असताना निधन झाले. निधनावेळी सायमन डिसोझा ८२ वर्षांचे होते, गुरुवारी (दि.२४) वास्कोच्या सेंट अँड्रू चर्चच्या दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत.

काही दिवसांपूर्वी सायमन डिसोझा यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बुधवारी पहाटे ४.३० च्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सायमन डिसोझा यांनी आपल्या कार्यकाळात विविध सामाजिक संघटनेवरील पदे सांभाळून अनेक समाजहिताची कार्ये केलेली आहेत. १९७६ सालात ते मुरगाव, बोगदा भागातून मुरगाव नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यानंतर १९८४ सालात झालेल्या निवडणुकीत सायमन डिसोझा यांची काँग्रेस पक्षावरून दाबोळी मतदारसंघातून आमदार म्हणून निवड झाली. १९८४ ते १९८९ या काळात त्यांनी दाबोळी मतदारसंघाचे आमदार या नात्याने विविध कामे केली. १९८९मध्ये पुन्हा झालेल्या विधानसभा निवडणुकीत सायमन डिसोझा वास्को मतदारसंघातून काँग्रेस पक्षावरून निवडणुकीत उतरले असता त्यांचा दुस-यांदा आमदार म्हणून विजय झाला. यानंतर त्यांची गोवा विधानसभेत उपसभापती म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी काही काळ हे पद सांभाळत विविध कार्ये केली. सायमन डिसोझा यांनी काही काळ मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणाचे (एमपीडीए) चेअरमनपदसुद्धा सांभाळलेले आहे. राजकीय नेता असण्याबरोबरच सायमन डिसोझा एक उत्तम पर्यावरणप्रेमीसुद्धा असून त्यांनी त्यांच्या काळात अनेक वर्षे वृक्षरोपण इत्यादी विविध कार्यक्रम आयोजित करून पर्यावरण हिताच्या दृष्टीने काम केले आहे. तसेच सर्वधर्मसमभावचा संदेश पसरवण्यासाठीसुद्धा सायमन डिसोझा विविध कार्यक्रम करताना मागच्या काळात दिसून आले आहेत. त्यांच्या पत्नी फेलिसिटी डिसोझा मुरगाव नगरपालिकेच्या माजी नगरसेविका आहेत.

सायमन डिसोझा यांना चार मुली व एक मुलगा आहे. ते साकवाळ येथे त्यांच्या पत्नी व कुटुंबातील इतर सदस्याबरोबर राहायचे. गुरुवारी त्यांच्या पार्थिव शरीरावर अंत्यविधी केल्यानंतर वास्कोतील सेंट अ‍ॅन्ड्रू चर्चच्या दफनभूमीत त्यांचे पार्थिव शरीर दफन करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. सायमन डिसोझा यांच्या निधनाबाबत वास्को तसेच गोव्यातील विविध ठिकाण्यावरील अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त करून त्यांच्या काळात ते एक उत्तम राजकीय नेता असण्याबरोबरच एक उत्तम व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले.