लोककला हे कलाकारांचे ऊर्जास्रोत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 14:25 IST2026-05-19T14:24:52+5:302026-05-19T14:25:57+5:30
राज्य सरकारच्या कला व संस्कृती खात्याकडून अशा प्रकारच्या उत्सवाचे आयोजन करण्यास मदत घेण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

लोककला हे कलाकारांचे ऊर्जास्रोत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, आमोणे : आमोणे गावात सांस्कृतिक महिलांची पथके असून, संपूर्ण गोवाभर विविध कार्यक्रमांत भाग घेऊन बक्षिसे प्राप्त करतात. त्यामुळे त्यांचा नावलौकिकही गोवाभर आहे, याचा मला अभिमान आहे. येथील ज्येष्ठ नागरीकही कला सादरीकरणात मागे नाहीत. त्यांनी हल्लीच दोन नाट्यप्रयोग उत्कृष्टपणे करून आपली कला सिद्ध केली. अशा प्रकारच्या नृत्य लोककला उत्सवांतून कलाकारांचा उत्साह वाढतो व त्यांचे आरोग्यही उत्तम राहते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
राज्य सरकारच्या कला व संस्कृती खात्याकडून अशा प्रकारच्या उत्सवाचे आयोजन करण्यास मदत घेण्याचे उपस्थितांना आवाहन केले. आमोणे, पिंपळवाडा येथील ब्रह्मेश्वर मंडपात "संस्कृतायेचे पावल-२०२६" या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास मुख्यमंत्री सावंत हे मुख्य पाहुणे म्हणून संबोधित करीत होते.
यावेळी सरपंच वसंत सिनारी, नावेलीचे सरपंच नारायण गावस, हरवळेचे सरपंच गौरवी नाईक, कुडणेचे सरपंच दामोदर पेटकर, कला व संस्कृती खात्याचे संचालक विवेक नाईक, बाल भवनचे संचालक सुनील सिनारी, साखळी भाजपाचे अध्यक्ष रामा नाईक, प्रवीण सावंत, कृष्णा गावस आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.