शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

‘फ्लाइंग फ्रान्सिस’ लंडनला!

By admin | Updated: November 5, 2014 02:20 IST

महिनाभराचा दौरा : २२ नोव्हेंबरला परतणार

पणजी : उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा पुन्हा विदेश दौऱ्यावर गेले असून या वेळी ते महिनाभर लंडनमध्ये राहणार आहेत. २२ नोव्हेंबरला ते गोव्यात परततील, असे सांगण्यात आले. कुठल्याही राज्याचा उपमुख्यमंत्री एवढा काळ राज्याबाहेर राहिलेला नसेल. गेल्या अडीच वर्षांच्या काळात किमान वर्षभर तरी ते देशाबाहेरच राहिलेले आहेत. यापूर्वी कॅनडा दौऱ्यावर गेले असता, तेथे त्यांनी तीन महिने काढले होते. आॅस्ट्रेलिया, पोर्तुगाल, कॅनडा, जर्मनी आदी किमान आठ वेगवेगळ्या देशांचे दौरे त्यांनी याआधी केलेले आहेत. उपमुख्यमंत्रिपदासारख्या महत्त्वाच्या पदावर असताना ते एवढा काळ विदेशात राहतात, याबद्दल खुद्द एका सत्ताधारी आमदारानेही ‘लोकमत’च्या या प्रतिनिधीकडे बोलताना आश्चर्य व्यक्त केले. केवळ नावापुरते उपमुख्यमंत्रिपद आहे, कोणतेही अधिकार त्यांच्याकडे नसावेत म्हणूनच कंटाळून ते विदेश दौरे करीत असावेत, अशी टीका या आमदाराने नाव उघड न करण्याच्या अटीवर केली. विशेष म्हणजे डिसोझा यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाबरोबरच महसूल, नगरविकास अशी महत्त्वाची खाती आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक कामे अडून राहतात. या दोन्ही खात्यांचे सचिव आपल्या अधिकारात काही कामे करून घेत असले, तरी महत्त्वाच्या कामांच्या फाइल्स डिसोझा यांच्या अनुपस्थितीमुळे अडकून पडतात. डिसोझा यांच्या कार्यालयात संपर्क साधला असता, त्यांचा हा दौरा खासगी असल्याचे सांगण्यात आले. डिसोझा हे पत्नी तसेच मुलांसह लंडनला स्वखर्चाने गेले आहेत, असाही दावा करण्यात आला. (प्रतिनिधी)